आवडलं का जेवण – दाता माणूस विजय वड्डेटीवार

29

✒️रोशन मदनकर(उप संपादक

ब्रम्हपुरी(दि. 19 मे ):- महाराष्ट्राचे माजी मंत्री, ब्रम्हपुरीचे आमदार मा. विजय वड्डेटीवार ही एक वेगळीच प्रख्यात असलेली व्यक्ती आहे. राजकारण असो की समाजकारण त्यांच्या प्रत्येक कामांची प्रशंसा होणे ही काही मोठी गोष्ट नाही. एक मजबूत बाणा असलेले व्यक्ती म्हणजे विजय वड्डेटीवार. स्थानिक ब्रम्हपुरी मध्ये नवीन वास्तूचे 15 मे रोजी साहेबानी ब्रम्हपुरीकरांचे जेवण ठेवले ना कुठलाही भेदभाव बाळगता त्यांनी सर्वांचे स्वागत केले. जवळपास 15 हजार लोकांनी वास्तुपुजनाचे जेवणाचा आस्वाद घेतला. एवढ्यावरच न थांबता प्रत्येक गोष्टीची स्वतः जाऊन शहानिशा केली.

साहेब नकळत गालाला हात लावून चिमुकल्यास विचारतात ”आवडलं का जेवण”. कार्यकर्त्यांना म्हणतात प्लेट उचलणारे , धुणारे कमी पडतात लक्ष द्या. साहेब आज एक आमदार म्हणून नाही तर एक साधारण माणसातला माणूस म्हणून फिरतोय. आज हा खरा दाता माणूस जनसमान्यात फिरतो आणि सर्वांचे स्वागत करतो. त्यांनी ब्रम्हपुरीकराना जेवण देने हे त्यांच्यासाठी फार मोठी गोष्ट नाही परंतु त्यांचा ब्रम्हपुरी जनते विषयीचा स्नेह फार मोठा आहे. वेळ कोणतीही असो मदतीचा हात पुढे साहेब सरसावतात. साहेब हजर असो की नसो गोरगरिबांना लागणारी मदत कार्यकर्तेच्या हातून पाठवीत असतात .

आजच्या घडीला आमदार विजय वड्डेटीवार साहेब ब्रम्हपुरी करांचे लाडके लोकनेते म्हणून प्रसिद्धीस आहेत. ब्रम्हपुरी करांच्या मनोरंजनासाठी, जनतेच्या कला गुणांना वाव देण्यासाठी साहेब ‘ब्रम्हपुरी महोत्सव’ राबवत असतात. जनतेचं मन ओळखणारा दाता माणूस आमदार विजय वड्डेटीवार याना जनतेची साथ त्यांच्या स्वभावानेच मिळाली आहे. ब्रम्हपुरी क्षेत्र हा बालेकिल्ला त्यांच्या कर्तृत्ववानीच निर्माण झाला आहे.