बांबू पुरवठा करण्यास हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यास “संतोष पटकोटवार” यांचा “दे दणका!”

40

सद्ध्याचा काळ केवळ फोटो काढण्या पुरती समाजसेवा,स्टेजवर खुर्चीसाठी धडपड,आयुष्यातील महत्वाच्या प्रश्नांना बाजूला ठेऊन पदासाठी स्वाभिमान विकून दिखाऊ समाजसेवा करणाऱ्या अनेक लोकांचा मेळा आपल्याला आपल्या सभोवती दिसतो.

अर्थात त्यात काही सज्जन आणि सद्गृहस्थ अपवाद पण असतात बरं का?त्या अपवादात आदरणाने नाव घेतले जावे असे व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या बुरड समाजातील गडचांदुर (चंद्रपूर) गावचे समाज बांधव संतोषजी पटकोटवार.(8888794594)

चंद्रपूर जिल्ह्यात ग्रामीण भागातील नव्वद टक्के बुरड समाज हा बांबू आणि बांबूपासून विविध साहित्य तयार करून त्याची विक्री करून आपला उदरनिर्वाह करतात.यात कच्चा माल म्हणून बांबू हा घटक फार महत्वाचा ठरतो हे आपणा सर्वांना समाज बांधव म्हणून माहिती आहे.समाजव्यवस्थेत दालित म्हणून हालकीचे जीवन जगणाऱ्या आपल्या समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेत सामाजिक न्याय देण्यासाठी व दलितांचे उत्थान करण्यासाठी शासनाला विविध उपक्रम राबण्यासाठी अनेक मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत.त्याचाच एक भाग म्हणून दलित असणाऱ्या बुरड समाजाच्या उदरनिर्वाहसाठी शासनाच्या वनखात्याने चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी शासकीय बांबू डेपो सुरू केलेत.या बांबू डेपोतून रास्त दरात आपल्या समाज बांधवांना बांबू मिळत असतात.आणि बांबू पासून काम करून या भागात आपला समाज पोटाची खळगी भरत असतो.

मात्र पुढे-पुढे शासनाच्या उदासीन धोरणामुळे या पाच ते सहा वर्षापासून या भागात बांबू डेपोत बांबू येणं बंद झालं. वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं.प्रशासन नेहमी प्रमाणे आपल्या शासकीय शैलीत उडवा-उडवीची उत्तरे देऊ लागलं.या परिसरातील बुरड समाज बांधव हतबल झाले. आधीच या भागातील आर्थिक,सामजिक,शैक्षणिक दृष्ट्या मागास असणाऱ्या बुरुड समाजास उपासमारीची पाळी येईल की काय? असं प्रश्नचिन्ह निर्माण झालं.उदर निर्वाहासाठी अनेक नव्या साधनांचा शोध सुरू झाला.

पण *”बुडते हे जण न देखवे डोळा! म्हणोनी येतो कळवळा!* या संत तुकोबांच्या उक्तीप्रमाणे आपल्या समाजातील संतोष पटकोटवार नामक व्यक्ती पुढे येतात आणि लढाई सुरू होते शासनाच्या गलथान काभाराविरुद्ध.संतोषजी वनखात्यातील अनेक अधिकाऱ्यांना भेटून हे बांबू डेपो सुरू होण्यासाठी निवेदन देणं,अधिकाऱ्यांना विनवण्या करणं, बांबू डेपोची बुरड समाजासाठी गरज, बुरड समाजाची सामजिक-आर्थिक परिस्थिती हे शासनाला पटवून देण्यासाठी अथक प्रयत्न करतात.हे सर्व करत असताना उदासीन झालेली शासन व्यवस्था जागी करणं इतकं सोपं नसतं.

त्यासाठी संतोषजी सारख्या लढाऊ आणि सच्चा प्रामाणिक कार्यकर्त्याची गरज असते.संतोषजी हा लढा जवळपास दोन वर्ष लढतात.पुढे हा लढा जिल्हा अधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे येऊन पोहचतो.एकटे संतोषजी बुरड समाजासाठी बांबू मिळणं का आवश्यक आहे? आणि शासनाचा शासकीय आदेश असताना केवळ डेपो आणि वनखात्याच्या अधिकाऱ्याच्या गुर्मीमुळे बांबू देण्यास कशी हयगय होते.याची सविस्तर चर्चा जिल्हा अधिकारी साहेबांना वारंवार भेटून करतात.आणि जिल्हा अधिकारी साहेबांचा आदेश येतो,*”बुरड समाजाला बांबू पुरवठा करण्यास हयगय करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत.*”आणि जय होतो संतोषजी पटकोटवार यांच्या लढाईचा,ग्रामीण भागात बांबू काम करून आपली उपजीविका करणाऱ्या आपल्या कष्टकरी बुरड बांधवांचा,विजय होतो छत्रपती शाहू महाराज यांच्या आपल्या समाजाप्रती अपेक्षित असलेल्या सामजिक न्यायचा,विजय होतो आपल्या शिक्षणासाठी संघर्ष केलेल्या म.फुलेंचा,विजय होतो भटक्या बुरड जातीसाठी आरक्षणाची ढाल देणाऱ्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा!

संतोषजी आपण या परिसरातील बुरड समाज बांधवांसाठी केलेल्या या प्रामाणिक प्रयत्नास,लढाऊ बाण्यास,संघर्षास तमाम महाराष्ट्र बुरड समाजाच्या वतीने मानाचा मुजरा.!!!!
जय केतय्या!!!

✒️शब्दांकन:-(संजय मादेवार,यवतमाळ)मो:-9405402907