गेवराई तालुक्यातील सिरसमार्गच्या शेत मजुराची मुलगी झाली मुंबई पोलीस

42

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.20मे):-तालुक्यातील सिरसमार्गच्या शेत मजुराच्या मुलीची झाली मुंबई पोलीस दलात निवड जिद्द, आणि परिश्रम करण्याची हातोटी असेल तर कुठलीही अशक्य बाब शक्य होते. ते स्वतः अतिशय कसोटीने, जिद्दीने गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग येथील शेतात काम करणाऱ्या शेत मजुरांच्या मुलीने आपल्या आई वडिलांचं स्वप्न साकार केलं आहे. आणि ते साकार करण्यासाठी तिला घवघवीत यश आले आहे.

मुंबई पोलीस दलामध्ये क्रांती रेडे याची वर्णी लागली आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे सिरसमार्ग परिसरामध्ये कौतुक केले जात आहे. क्रांती कैलास रेडे ही मुलगी पहिल्यापासून जिद्दी होती. ग्रह विभागामध्ये करिअर करण्याचं तिचं स्वप्न होतं.

मुंबई येथे येथे नुकतीच पोलीस भरती पार पडली यामध्ये तिने चांगले संपादन केले आहे. क्रांती रेडे ही शेत मजुराची मुलगी आहे. तिचे आई वडील शेत मजुरीला जातात आणि आई वडीलांच्या या कष्टाचे फळ तिने साकार केले आहे. तिच्या या यशाबद्दल सिरसमार्गसह परिसरातील नागरिकांकडून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे