तहसीलदार साहेबांच्या कार्यतत्परतेने ऐन उन्हाळ्यात मिळतोय नागरिकांना दिलासा

32

✒️सातारा-खटाव,प्रतिनिधी(नितीन राजे)

खटाव(दि.20मे):-उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून लोकांना घराबाहेर पडणे अशक्य झाले आहे. अशा वेळी महसूल विभागातील कामकाज गतीने व्हावे, अशी अपेक्षा ठेवून आलेल्या नागरिकांना दिलासा देताना, खटावचे तहसीलदार किरण जमदाडे स्वतः त्यांची बाजू समजून घेत आहेत. कामांचा निपटारा करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.त्रिविभाजित खटाव तालुका , कराड तालुका, मान तालुका ,कोरेगाव तालुका त अशा ठिकाणी विभागला गेला आहे.

खटाव तालुक्यात १४० गावे व वाड्यावस्त्या असून, चार आमदार आणि दोन खासदार असलेल्या ठिकाणी अनेक, प्रशासनाची मात्र चांगलीच दमछाक होत असली तरी तालुका प्रमुख म्हणून मधुर वाणीत आपले कार्य कसे संपन्न करावे याची प्रचिती खटाव तालुक्याचे तहसीलदार किरण जमदाडे यांच्याकडून येते. मंडलाधिकारी, तलाठी, महसूल कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत, तरीही अनेकांची कामे होत आहेत. वडूज येथील तहसील कार्यालयात रोज दोनशे कामांसाठी येतात. या कार्यालयात नेहमीच गर्दी असते. पुणे, मुंबईपासून दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, आंध्र प्रदेश या राज्यातील मूळचे खटावकर विविध कामांसाठी कार्यालयात येतात. अशा वेळी शासकीय बैठकांव्यतिरिक्त

इतर कामांबाबत ग्रामस्थांना वेळ द्यावा लागतो. अनेक कामे सुरू दाखले, आहेत. महामार्गाच्या जमिनीविषयी निवाडा, विविध शिधापत्रिकांसंबधीची कामे, संजय गांधी निराधार योजना, लाभाच्या प्रकरणे, इतर योजनांची अंमलबजावणी, जमिनींबाबतची अतिक्रमण, गौण खनिजाबाबत तक्रारी, लिलाव व इतर तक्रारी यासंदर्भात शहानिशा करून मार्ग काढण्याची तत्परता जमदाडे यांनी दाखवली आहे. कोणावरही अन्याय होऊ नये, अपील करण्याची संधी मिळावी, याचीही काळजी घेत आहेत. सामाजिक प्रश्नांमध्येही अनेकांना मदत करण्यात ते अग्रेसर आहेत. संयमी, समजूतदार आणि मानवतावादी दृष्टिकोनातून लोकांना मदत करणारे अधिकारी म्हणून ते महसूल विभागात परिचित आहेत. काही कामे करत असताना,