लोकमाता अहिल्यामाई राष्ट्रीय पुरस्कार ॲड. करुणा विमल यांना जाहीर

33

✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मुंबई(दि.26मे):- लोकमाता अहिल्यामाई होळकर यांच्या जयंती निमित्त भगवा फौंडेशन, मुंबईच्या वतीने देण्यात येणारा मानाचा व सन्मानाचा पुरस्कार धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा व कोल्हापूर येथिल सामाजिक कार्यकर्त्या ॲड. करुणा विमल यांना जाहीर झाला असून या पुरस्काराचे स्वरूप मानाचा फेटा, सन्मानचिन्ह आणि पंधरा हजार रुपयांची पुस्तके असे असून ॲड. करुणा विमल यांच्या गेली दहा पंधरा वर्षे करीत असलेल्या सामाजिक प्रबोधनपर कामाची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

ॲड. करुणा विमल यांची तीन पुस्तके प्रकाशित असून पंधराहून अधिक विविध क्षेत्रातील पुरस्काराच्या त्या मानकरी आहेत. धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट आणि आम्ही भारतीय महिला मंचच्या माध्यमातून त्या विविध सामाजिक क्षेत्रात कृतिशील पद्धतीने समाज प्रबोधनाचे काम करतात.

या पुरस्काराचे वितरण लोकमाता अहिल्यामाई होळकर यांच्या जयंती निमित्त बुधवार दि. 31 मे, 2023 रोजी दुपारी 3:00 वा. पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सेक्टर 1, सी. बी. डी. बेलापूर, नवी मुंबई या ठिकाणी ज्येष्ठ स्त्रीवादी लेखिका आणि मराठी विभाग प्रमुख, मुंबई विद्यापीठ, मुंबईच्या प्रा. डॉ. वंदना महाजन यांच्या हस्ते होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ धम्म प्रचारक धम्माचारी बोधीसेन, सत्यशोधक ओबीसी परिषदेचे उल्हास राठोड, इतिहास अभ्यासिका मोनिका काळे उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमाचे आयोजन निमंत्रक छाया पाटील आणि भगवा फौंडेशन, मुंबई यांनी केले आहे.