जुगनाळा येथे मोदी@‌ 9 महा जनसंपर्क अभियानाची कार्यकर्ता बैठक संपन्न

29

🔸पक्ष संघटनेबरोबरच जनतेची कामे मजबुतीने करा- प्रा. अतुल भाऊ देशकर

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी (दि. 27 मे ):-तालुक्याच्या वतीने मोदी@ 9 विशेष जनसंपर्क अभियानाच्या संदर्भात तालुक्यातील वैभवशाली जुगनाळा या गावी ब्रह्मपुरी विधानसभेचे माजी आमदार आदरणीय प्रा.अतुल भाऊ देशकर यांचे अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन दि.25 मे 2023 रोजी दु. 2 वा.करण्यात आले होते. बैठकीला जिल्हा कार्यकारणीचे श्री अनिलजी डोंगरे हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते.

तसेच बैठकीला ब्रह्मपुरी तालुक्याचे भाजपा पितामह प्रा. कादर शेख सर तसेच प्राचार्य अरुण शेंडे तालुका अध्यक्ष भाजपा ब्रह्मपुरी, सौ.वंदनाताई शेंडे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा महिला आघाडी चंद्रपूर, सौ. शीलाताई गोंधोळे तालुकाध्यक्ष,भाजपा महिला आघाडी ब्रह्मपुरी, राजेश्वरजी मगरे तालुकाध्यक्ष, आदिवासी आघाडी ब्रह्मपुरी, शंकर दादा सातपुते माजी जिल्हा परिषद सदस्य, रामलाल दोनाडकर,तालुकाध्यक्ष भाजयुमो ब्रह्मपुरी तालुका,सौ.लक्ष्मीबाई सहारे सरपंच जुगनाळा, गोपालजी ठाकरे उपसरपंच जुगनाळा इ. मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वंदनीय गाडगे महाराज यांचे प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी अनिलजी डोंगरे यांनी महा संपर्क अभियानाच्या संदर्भात विस्तृत माहिती दिली. प्रा.कादर शेख सर यांनी देखील यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित केले. जिल्हा सचिव श्री तनयजी देशकर यांनी भाजपा महाराष्ट्र प्रदेशाच्या ठरावाचे वाचन केले. हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आल्याचे सभाध्यक्षाने जाहीर केले. कृषी उत्पन्न बाजार समिती ब्रह्मपुरी येथे संचालक म्हणून प्रचंड मताधिक्यांनी निवडून आल्याबद्दल प्रा. यशवंत आंबोरकर यांचा अतुल भाऊंच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
अध्यक्ष स्थानावरून संबोधित करताना माजी आमदार प्रा. अतुल भाऊ देशकर म्हणाले की, मोदींची नऊ वर्षाची यशस्वी कारकीर्द ऐतिहासिक आणि लोकोपयोगी निर्णयाने ओथंबून गेलेली आहे. मोदींचे हे कार्य जनतेसमोर नेणे गरजेचे आहे.

यासाठीच मोदी महा जनसंपर्क अभियानाची आयोजन करण्यात येत आहे. हे संघटित कार्य असल्यामुळे संघटन देखील मजबूत असणे गरजेचे आहे. त्यामुळे संघटन मजबूत करता करता जनतेची कामे सुद्धा होत असणे आवश्यक आहे. जनतेच्या कार्याशिवाय संघटनेला अर्थ उरत नाही. त्यामुळे जनतेची कामे करता करता संघटन करीत चला असा कानमंत्र अतुल भाऊंनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य अरुण शेंडे सर यांनी तर संचालन आणि आभार रामलाल दोनाडकर यांनी मानले.यावेळी तालुक्यातील शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख, माजी पं. स. सदस्य, माजी जि.प.सदस्य,जनसंपर्क अभियानाची तालुका समिती, विविध आघाड्यांचे पदाधिकारी, इ. बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी गोपाल ठाकरे यांनी मोलाचे सहकार्य केले.