जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी माजी आमदार घनदाट मामा थेट नगरपरिषदेत दाखल

31

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.6जून):-शहराला नगरपरिषद अंतर्गत मागील काही वर्षापासून दूषित पाणीपुरवठा ते पण आठ ते दहा दिवसाला होत असून या दूषित पाणी प्रश्नासाठी गंगाखेडचे माजी आमदार सिताराम घनदाट मामा येथे नगरपरिषद कार्यालयामध्ये पोहोचून मुख्य अधिकारी यांना लेखी निवेदन देत गंगाखेडचा पाणी प्रश्न लवकरात लवकर मिटला पाहिजे असे यावेळी माजी आमदार सीताराम घनदाट मामा यांनी मुख्याधिकारी यांना बोलताना सांगितले आहे.

माजी आमदार सिताराम घनदाट मामा यांच्याकडे काही महिलांनी फोन करून या पाणी प्रश्न संदर्भात विचारणा केली असता शहराचा पाणी प्रश्न गंभीर असून हा तात्काळ मिटवला पाहिजे या अनुषंगाने सामाजिक हित जोपासत माजी आमदार सिताराम घनदाट मामा थेट नगरपरिषदेमध्येच जाऊन लेखी निवेदन देऊन तात्काळ प्रस्ताव तयार करून पाठवण्यात यावा असे यावेळी मुख्याधिकारी यांना सांगण्यात आले तो प्रस्ताव माझ्यामार्फत मी मंजूर करून आणतो आणि गंगाखेड शहराला स्वच्छ पाणी पुरवठा करून शहराची जी समस्या आहे ती कायमस्वरूपी मिटवण्याचे काम करणार असल्याचेही यावेळी घनदाट यांनी सांगितले आहे. पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्वच नाल्याचे जेसीबी किंवा मजुराच्या साहाय्याने स्वच्छ करुन भविष्यात होणाऱ्या अडचणीला दूर करण्याचे ही यावेळी घनदाट यांनी सांगितले .

शहराच्या मुख्य ठिकाणी असलेल्या संत जनाबाई मंदिराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून कायमस्वरूपी शहर स्वच्छ करण्यात यावे नागरिकांना कसल्याच प्रकारे शहरात अडचण निर्माण होऊ नये याची दक्षता प्रशासनाने घेण्यात यावी अशी यावेळी माजी आमदार सिताराम घनदाट यांनी यावेळी सांगितले आहे.

यावेळी दतराव भोसले, गौतम रोहिणीकर ,चंद्रकांत खंदारे ,प्रमोद साळवे , माधव ठावरे, शेख मुस्तफा, किरण कैसे, विजय रमतापुरे, गणेश सातपुते ,संतोष जाधव ,स्वप्निल राठोड, सुरेश बंडगर, प्रकाश वरवडे, बाळू डाके, सुभाष शेटे यावेळी उपस्थित होते.