रविवारी गडचिरोली येथे गझल कार्यशाळेचे आयोजन

34

🔸इच्छुकांनी कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.७ जून):- झाडीबोली साहित्य मंडळ जिल्हा शाखा गडचिरोली तर्फे गझल कार्यशाळा येत्या रविवारी दिनांक ११ जूनला सकाळी ११.०० वा. शिवाजी महाविद्यालय, गोकूळनगर येथे आयोजित केलेली आहे. इच्छुकांनी कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही मंडळाच्या वतीन करण्यात येत आहे.

आजच्या युगात साहित्यिक व रसिक गझलेच्या प्रेमात पडत आहेत. साहित्य क्षेत्रातील अनेक कवीं गझलेची बाराखडी माहित नसतांना गझलसदृश्य रचनेला गझल म्हणून कंटाळतात आणि टीकेला पात्र होतात.

काहींना गझल म्हणजे काय? हे जाणून घेण्याची उत्सुता असते; पण गझलगुरू दुर्मीळ असल्याने ते शक्य होत नाही. या बाबींची दखल घेऊन झाडीबोली साहित्य मंडळ जिल्हा शाखा गडचिरोली तर्फे गझल कार्यशाळा रविवार दिनांक ११ जूनला सकाळी ११.०० वा. शिवाजी महाविद्यालय, गोकूळनगर येथे आयोजित केलेली आहे. सदर कार्यशाळेला झाडीपट्टीतील सुप्रसिद्ध गझलकार दिलीप पाटील, प्रशांत भंडारे हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच या कार्यशाळेचे अध्यक्षस्थान प्रसिद्ध गझलकार मिलिंद उमरे हे भुषविणार आहेत.

सदर कार्यशाळेतून गझलेची बाराखडी, तंत्र-मंत्र याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. तरी इच्छुक कवी, जिज्ञासूनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन झाडीबोली मंडळाचे पदाधिकारी प्रा.विनायक धानोरकर, डॉ.प्रविण किलनाके, जितेंद्र रायपुरे, पुरूषोत्तम ठाकरे, प्रतिक्षा कोडापे आदींनी केले आहे. अधिक माहिती साठी ९४२३६४६७४३ या मोबाईल नंबर संपर्क साधावा, अशी माहिती श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजींनी आमच्या कार्यालयास दिली आहे.