भोसले -पाखरे परिवाराने सत्यशोधक विवाहात आलेल्या पाहुण्यांना पुस्तके भेट दिली!

88

✒️कल्याण(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कल्याण(दि.7मे):- येथील शहाड भागात असणाऱ्या गुरुद्वारा सचखंड हॉल मध्ये नितीन भोसले यांची कन्या दिव्या आणि डॉ राजेश पाखरे श्रीगोंदा अहमदनगर यांचा मुलगा ऋत्विज यांचा सत्यशोधक विवाह 4 जून 2023 रोजी अत्यंत साध्या पद्धतीने आनंदी वातावरणात संपन्न झाला. यावेळी सर्व पाहुणे, मित्रपरिवार यांचे स्वागत सत्कार हा फेटा,टोपी- रुमाल असा पारंपरिक पद्धतीने न करता त्यांना *गुरू रविदास-संत कबीर दोहे आणि अर्थ* हे पुस्तक भेट देण्यात आले.उपस्थित सर्व महिलांनाही *पुस्तके* भेट देण्यात आली.

पुस्तकाची ही भेट सर्वांना आवडली. विवाह विधीत वधू वर यांच्या हस्ते संत आणि महापुरुष यांच्या प्रतिमा यांना पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले.वधू वर यांचे आई वडील यांना मंचावर बोलावून त्यांनी आपसात पुस्तके देत-घेत स्वागत केले. सत्यशोधक विवाहविधीत हभप रामेश्वर तिरमुखे यांनी उपस्थित सर्व पाहुणे यांचे *प्रबोधन* केले. सत्यशोधक विवाहविधी बाबत त्यांनी माहिती दिली. त्यांना सत्यशोधक पद्धती कशी आवश्यक हे पटले. सर्वांनी सत्याचा अखंड गायन केला. त्यानंतर वधू वर यांनी सत्यशोधकीय *वंदन* केले.

त्यानंतर वधू वर यांनी स्वतंत्रपणे *शपथ* घेतली. त्यानंतर *शिवपंचके* झाली. अक्षता म्हणून धान्य न वापरता फुलांच्या पाकळ्या वापरल्या.असा हा सत्यशोधक विवाह संपन्न झाला.त्यावेळी उपस्थित सर्व पाहुणे मित्रमंडळी यांना खूप आवडला आणि आमच्या मुला मुलींचे विवाह ही आम्ही सत्यशोधक पद्धतीने करू विधीकर्ते हभप रामेश्वर तिरमुखे यांची भेट घेत म्हणू लागले. सत्यशोधक पद्धतीने आचरण करणे ही आजच्या काळाची गरज आहे.तिचा अवलंब मोठ्या संख्येने होत आहे, ही चांगली बाब आहे.