नांदेड येथील मृतक अक्षय भालेराव च्या आरोपीना कठोरात कठोर शिक्षा द्या – पुरोगामी युवा ब्रिगेड ची मागणी

43

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.7जून):- बोंढार (हवेली) तालुका नांदेड येथील युवक अक्षय भालेराव याच्यावर दिनांक 1 जुन रोजी गावातीलच काही युवकांनी जातीवाचक शिवीगाळ करत त्याचा खून केला. त्या आरोपीना कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी पुरोगामी युवा ब्रिगेड ने निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी यांना केली आहे.

अक्षय चा खून हा समाजमन सुन्न करणारी घटना असून अक्षय ने गावात प्रथमच बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्यामुळे त्याचा खून करण्यात आला आहे असा आरोप करण्यात येत आहे. ही घटना पुरोगामी महाराष्ट्राला शोभनारी नसून सदर घटनेची चौकशी करून आरोपिंना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी तसेच मृतक अक्षय यांच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी निवेदनात केली आहे.

यावेळी पुरोगामी चे जिल्हाध्यक्ष शिवशंकर सुरोशे, जिल्हापाध्यक्ष सुनील लोखंडे, जिल्हा सचिव सागर शेरे, तालुका अध्यक्ष भागवत सूर्यवंशी, बाळासाहेब चंद्रवंशी, शाहरुख पठाण, अनिल हरणे, शहराध्यक्ष ईरफान शेख, प्रफुल दिवेकर, आतिश वटाणे, निशांत मनवर, ईफराज काजी आदी उपस्थित होते.

चौकट :- “अक्षय चा खून हे या गोष्टीची साक्ष देतो कि आजही महाराष्ट्रातील काही गावात जातीयवादी मानसिकता जिवंत आहे.

लोकांना आज प्रबोधनाची आणखी गरज आहे. पुरोगामी युवा ब्रिगेड च्या माध्यमातून आम्ही खेड्या पाड्यात जाऊन लोकांचे प्रबोधन करत आहोत.

शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांनी मशागत झालेल्या या महाराष्ट्राच्या भूमीत धर्मांधतेचे पीक आम्ही येऊ देणार नाही.”
शाहरुख पठाण
प्रवक्ता, पुरोगामी युवा ब्रिगेड