दोघांवर प्राणघातक हल्ला-14 जणांविरुद्ध गुन्हे दाखल

40

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि. 13 जून):-शहरातील खडकपूरा भागात त्रिमुर्ती ज्वेलर्स समोर कामा निमित्त गेलेल्या बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्रावर 14 जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना दि.11 जून रोजी दुपारी 3 वाजताचे दरम्यान घडली आहे.

फिर्यादी सुनिल शहाणे यांच्या तक्रारीवरून उमरखेड पोलीसांनी 14 जणांविरुद्ध भादंवि 307, 324, 323,294, 143, 147, 148, 149 नुसार गुन्हा दाखल केला असून काही आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे व उर्वरित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

बजरंगदलाचे तालुका अध्यक्ष फिर्यादी सुनिल शहाणे आणि त्यांचे मित्र अमोल नरवाडे यांच्यासोबत खडकपुरा वार्डातील त्रिमुर्ती ज्वेलर्स येथे कामा निमित्त गेले होते.

अमोल हा दुकानात गेला होता. तेथून आरोपी शेख अयाज हा मोटर सायकलने ट्रिपल बाहेरून जात होते.त्या दरम्यान उभे असलेल्या सुनिल शहाणे यांचे कडे तिघेही रागाने पाहु लागले व हाच तो म्हणून त्यांनी पुढे जाऊन गाडी थांबविली.

तेव्हा रागाने पाहण्याचे कारण काय असे त्यांना विचारले असता त्यांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण सुरु केली त्यानंतर अयाज याने मोटर सायकलचा गेअर वायरने हातावर पाठीवर छातीवर मारहाण करण्यास सुरुवात केली तेव्हा सुनिल हा खाली पडल्यावर शेख अयाज हा त्याचा गळा आवळु लागला तेव्हा त्याच्या साथीदाराने लोखंडी शस्त्राने त्याच्या उजव्या बरगडीवर जोरदार हल्ला केला त्यावेळी त्याचा मित्र अमोल नरवाडे हा सोडवा सोडवी करण्यासाठी तेथे आला असता स्वामीच्या मठाकडून आलेल्या 4 ते 5 जणांनी अमोल यास लाथ बुक्की व लोखंडी रॉडने मारहाण सुरु केली तेव्हा तेथे स्वप्नील डहाळे डेव्हीड शहाणे, प्रकाश कामरानी यांनी आरोपींच्या तावडीतुन सोडविले त्यावेळी खडकपुरा कडून आलेल्या चार ते पाच जणांकडे लोखंडी रॉड मोटर सायकलचे शॉकॉप व धारदार शस्त्रे घेऊन त्यांनीही पुन्हा मारहाण करून जिवाने मारण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी वाहनातून तेथे पोलीस दाखल झाले व मारेकरी पसार झाले. लगेच पोलीसांनी जखमींना रुग्णालयात घेऊन गेले त्यावेळी 14 आरोपींनी मारहाण केल्याची माहिती सुनिल यांच्या मित्राने दिली. त्यानुसार सुनिल शहाणे यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन पोलीसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून घटनेतील काही आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली.

ठाणेदार अमोल माळवे यांच्या मार्गदर्शनात पो.उपनिरिक्षक प्रशांत देशमुख पूढील तपास करीत आहे.