एस.पी. समीर शेख यांचा वडूज येथे रूटमार्च

46

✒️सातारा/खटाव,प्रतिनिधी(नितीन राजे)मो:-9822800812

सातारा(दि.15जून):-वडूज तालुका खटाव जिल्हा सातारा येथे मा. श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा यांचे उपस्थितीत आगामी बकरी ईद, कोल्हापूर जिल्हयातील जातीय, धार्मिक तेढ निर्माण करणारी घटना,नांदेड घटनेचे पार्श्वभुमीवर वडूज शहरात रुटमार्च.काढण्यात आला.पोलीस स्टेशन हद्दीत वडूज शहरामध्ये आगामी बकरी ईद, कोल्हापूर जिल्हयातील जातीय / धार्मिक तेढ निर्माण करणारी घटना, नांदेड येथील घटना वगैरे ठिकाणी
वेगवेगळ्या धार्मिक तेढ निर्माण करणा-या घटना घडलेचे पार्श्वभूमीवर. बुधवारी सायंकाळी ०६/०० वा दरम्यान मा. पोलीस अधीक्षक सातारा सह, मा. आश्विनी शेंडगे मॅडम
दहिवडी विभाग दहिवडी, मा. श्री अजय कोकाटे सो परी पोलीस उपअधीक्षक वडूज पोलीस स्टशन, सपोनि माने सो वडूज, सपोनि दराडे आँध पोस्टे, पोउनि किंद्रे औंध पोस्टे व पोलीस स्टाफ असे ६ पोलीस अधिकारी ४५ पोलीस अंमलदार यांचे समवेत वडूज शहरातून वर्दळीचे ,संवेदनशील ठिकानी, वडूज मुख्य बाजारपेठ,हनुमान मंदीर,शेतकरी चौक,सिध्दनाथ मंदीर ,संभाजी चौक, शिवाजी चौक, पोलीस स्टेशन असा रूट मार्च काढून.सुचना देणेत आल्या.

एस पी समीर शेख, यांनी जिल्हयात तसेच पोलीस ठाणे हद्दीतील सोशल मिडीया (वॉटसअप, फेसबुक, इन्स्टाग्राम वगैरे) यांचेवर प्रशासनाकडून गोपनीय तसेच बारकाईने लक्ष ठेवणेत येत आहे. वरील घटनांचे कारणास्तव जिल्हयातील नागरीकांनी तसेच तरुण पिढीने सोशल मिडीयावर कोणत्याही प्रकारचे जातीय/ धार्मिक तेढ निर्माण करणारे मॅसेज टाकून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी तसे प्रशासनाचे निदर्शनास आलेस संबंधीतांवर योग्य ती
प्रतिबंधात्मक / कायदेशीर कारवाई करणेत यावी अश्या सुचना देणेत आल्या.

तरी जिल्हयातील,वडूज पोलीस ठाणे हद्दीतील, दहिवडी उपविभागातील सर्व नागरीकांना सुचित करणेत आले
की, सोशल मिडीयावर तसेच इतर माध्यमातून जातीय तेढ निर्माण करणारे मॅसेज वायरल केलेस किंवा टाकलेस कायदेशीर कारवाई करणेत येईल, त्यादृष्टीने प्रशासनावतीने सदर मोबाईल अॅप्लीकेशन, सोशल मिडीयाची माध्यमे यांचेवर करडी नजर ठेवणेत येत आहे. याची दखल जिल्हयातील तसेच पोलीस ठाणे हद्दीत शांतता / जातीय सलोखा राखावा वगैरे मार्गदर्शनपर सुचना मा. समीर शेख पोलीस अधीक्षक साो सातारा यांनी दिल्या.