अक्षय भालेराव हत्या निषेधार्थ बौद्ध बांधवांचा जनआक्रोश मोर्चा

33

🔹भर उन्हात ३ हजार बौद्ध बांधवांची उपस्थिती

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि. 16 जून):- विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून नांदेड जिल्हातील बोंढार हवेली या गावातील भीमसैनिक अक्षय भालेराव या तरुणाची जातीयवाद्यांनी निर्घृण हत्या केली. तसेच अक्षय भालेराव याच्या आई-वडील व भावालाही बेदम मारहाण करून त्यांच्या घरावर दगडफेक केली.ही घटना पुरोगामी महाराष्ट्राला अशोभनीय आणि काळीमा फासणारी आहे. त्यामुळे या घटनेच्या निषेधार्थ ब्रम्हपुरी तालुक्यातील खेड्यापाड्यातून ३ हजाराहून अधिक बौध्द बांधवांनी मोर्चात सामील होऊन अन्यायाविरुद्ध आवाज बुलंद केला.

स्थानिक बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे चौकातून मोर्चा सुरुवात झाली त्यापूर्वी तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद भीमसैनिक अक्षय भालेराव यांनाअभिवादन करण्यात आले .समाज बांधवांच्या वतीने अक्षय भालेराव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून नामांतर मनोहर मंडपे यांच्या हस्ते मोर्चाला सुरुवात करण्यात आली .

या मोर्चाचे वैशिष्ट्य म्हणजे भर उन्हातही तालुक्यातील खेडेपाडातील तमाम बौद्ध बांधवांनी उपस्थिती दर्शवली तालुक्यातील समता सैनिक दलानी शिस्तबद्ध असे मोर्चाला.आगे कुच केले मोर्चा बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे चौक, सम्राट अशोक चौक, रेणुका माता मंदिर चौक , मर्दान अल्ली चौक, शिवाजी चौक, ख्रिसतानंद चौक ,इथून आगे कूच करत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला .यावेळी मोर्चेकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्राचे राज्यपाल यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. ज्यात प्रामुख्याने १) अक्षय भालेराव यांच्या कुटुबीयांस ६० लाखांची तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी २) अक्षय भालेराव याच्या भावास तात्काळ शासकिय नौकरीवर घेण्यात यावे
३)अक्षय भालेराव यांच्या हत्येचे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात यावे ४) सदर प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी ५) सदर प्रकरणाचा तपास सीबीआय कडे सोपवून पडद्यामागील आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावरही कठोर कार्यवाही करण्यात यावी ६) बोंढार हवेली या गावात बौद्ध समाजाच्या संरक्षणासाठी कायमस्वरूपी पोलिस चौकी स्थापन करण्यात यावी ७) अक्षय भालेराव यांच्या कुटुंबीयास कायमस्वरूपी पोलिस संरक्षण देण्यात यावे ८) सदर प्रकरणातील सर्व आरोपींची मालमत्ता जप्त करण्यात यावी . इत्यादी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

यावेळी निवेदनकर्ते म्हणून डेविड शेंडे, लीलाधर वंजारी, प्रशांत डांगे,ॲड.आशिष गोंडाणे,सुरज मेश्राम,पद्माकर रामटेके,डॉ. स्निग्धा कांबळे,भीमराव बनकर डॉ.प्रेमलाल मेश्राम,रवी मेश्राम, जीवन बागडे,नरेश रामटेके, सतिश डांगे, प्रभु लोखंडे,चंद्रभान राऊत,मदन शेंडे, रक्षित रामटेके, प्रफुल फुलझेले,केशिप पाटील यांच्या सह मोठ्या संख्येने बौध्द बांधव उपस्थित होते.