एकनिष्ठा फाऊउंडेशन तर्फे 14 जून जागतिक रक्तदाता दिवस साजरा

34

✒️खामगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

खामगांव(दि.15जून):- रक्तसेवेत सदैव अग्रेसर असलेल्या एकनिष्ठा गौ-सेवा रक्तसेवा फाउंडेशन ही संस्था गेल्या 2013 पासून अविरत नि:शुल्क रक्ताची सेवा देत आहे आता पर्यंत सतरा हजाराच्या वर रुग्णांना रक्त पुरवठा विविध राज्यात आपल्या मित्र मंडळीच्या सहकार्याने सेवा देत आहे गरीब गरजू रुग्णांना पॉजिवटिव रक्तासह दुर्मिळ रक्तगट रक्तदात्यांच्या निःस्वार्थ रक्तदानाने थैलीसिमिया ग्रस्त, सिकलसील ग्रस्त , दिव्यांग, एनिमिया आजार असलेल्या रुग्णांना रक्तसेवा पुरविण्याचे काम ह्या संस्थे मार्फत सर्व पदाधिकारी, सदस्य सेवा देत आहे हे विशेष.

आज दिनांक 14 जून रोजी जागतिक रक्तदान दिवस एकनिष्ठा फाउंडेशन तर्फे साजरा करण्यात आला यावेळी रक्तदाते विनोदभाऊ लाहूडकर, अमोल माने, संदीप जरीया, अमित शेळके, विशाल टेकाळे, शेख निसार, प्रदीप घोडेकर आदि लोकांनी गरजू रुग्णांना वेळेवर रक्तदान करून दिले नविन जिवनदान तसेच सुरजभैय्या यादव यांनी रक्तदानाचे महत्व काय आहे या विषयी माहिती दिली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. प्रणाली देशमुख मैडम है होते.

यावेळी एकनिष्ठा फाउंडेशन संस्थापक सुरजभैय्या यादव, जितेंद्र मच्छरे सिद्धेश्वर निर्मळ, यावेळी सामान्य रुग्णालयाचे रक्त संक्रमण अधिकारी सौ. देशमुख, अमोल कराळे, संतोष दारमोडे, विष्णु मुंडे, सौ. राजश्री पाटील, योगेश देवगिरकर,सौ. अलका शिंदे, अशोक पराते यांनी सहकार्य केले आणि एकनिष्ठा फाउंडेशनच्या कार्याचे सर्व रक्तदात्यांचे कौतुक केले पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा सुद्धा दिल्या अशी माहिती जितेंद्र मच्छरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.