सहा वर्षाच्या चिमुकलीचा काकानेच केला विनयभंग

69

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि. 29जून):- शहरापासून जवळ असलेल्या एका खेड्यात माणुसकी व नातेसंबंध ला काळिमा फसणारी घटना काल सायंकाळी साडेपाच च्या सुमारास घडली.

लहान चिमुकली आपल्या घराजवळ खेळत असताना बावीस वर्षीय चुलत काकाने तिला चॉकलेट चे आमिष दाखवले व तिला जवळच्या शेताकडे घेऊन गेला. त्या चिमुकलीला शेतात घेऊन जाताना गावातील एका व्यक्तीने पहिले आणि हा मुलीला कोठे घेऊन जात आहे हे पाहण्यासाठी त्यांच्या मागे गेले असता तो नराधम चिमुकली सोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न करत होता. तो व्यक्ती तिथे पोहचतात आरोपी घटना स्थळून पळाला घटनेची माहिती घरच्यांना कळताच त्यांनी बिटरगाव पोलीस स्टेशन गाठून घटनेची रीतसर तक्रार नोंदवली.

पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासाला गती दिली व 24 तासाच्या आत आरोपीला आदिलाबाद येथून अटक केली. आरोपीवर विनयभंग व पोक्ससो अंतर्गत गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास बिटरगाव पोलीस स्टेशन करत आहे.