रेती तस्करी करण्याऱ्यांनी नायब तहसीलदारावर केला हल्ला

33

🔺संशयित आरोपीवर महागाव पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल

✒️ सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

महागाव (दि.30 जून):-तालुक्यातील मोरथ वाकोडी येथे रेती तस्करी करणाऱ्यावर कार्यवाहीसाठी गेलेल्या तहसिलदारावर रेती तस्करी करण्याऱ्यांनी हल्ला केल्याची घटना आज सकाळी सात वाजेच्या सुमारास समोर आली आहे.

या प्रकरणी नायब तहसीलदार विश्वभर राणे यानी महागाव पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केला असून कलम 353, 332, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवानंद मारोती बहाद्दूरे रा. मोरथ तालुका महागाव जिल्हा यवतमाळ असे संशयित रेतीहल्लेखोर तस्करूचे नाव आहे.

महसूल विभागाला मोरथ ते वाकोडी पूसनंदी पात्रात ट्रॅक्टरच्या रेती तस्करी सुरु असल्याची गोपनीय माहिती सकाळी मिळाली. त्या आधारे तहसीलदार विश्वभर राणे हे कोतवाल वैरागडे, शंकर चव्हाण, सदानंद जराड यांच्यासोभत कार्यवाहीसाठी गेले.

महसूल अधिकारी कार्यवाहीसाठी आल्याचा सुगावा लागल्यावर तसकऱ्यांनी पोबारा केला त्यातच एक मजूर महसूल पथकाला मारहाण करण्यास सुरुवात केली.

तस्कराने पथक प्रमुखाला मारहाण करण्यास सुरुवात केली. तुम्ही माझे काहीच वाकडे करू शकत नाही असे सांगत शासकीय कामात अडथळा निर्माण केला.तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.या प्रकरणी महसूल पथकाने महागाव पोलीस स्टेशनला फिर्यादी वरून गुन्हा दाखल केले.