चिमूरच्या तहसील कार्यालयात लिंकच्या समस्येमुळे अनेक दाखले प्रलंबित-जनतेत असंतोष!!

33

✒️सुयोग सुरेश डांगे(चिमूर प्रतिनिधी)

चिमूर(दि.1जुलै):- तहसील कार्यालयात लिंकच्या समस्येमुळे अनेक लोकांचे उत्पन्न दाखले, जातीचे प्रमाणपत्रे, रहिवाशी व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्रे एक महिना, पंधरा दिवसापासून मिळत नसल्यामुळे जनतेत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

सातत्याने लिंक राहत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शॆक्षणिक नुकसान तर होणार नाही ना? अशी भीती निर्माण झालेली आहे. लोक खेडेगावातून अनेकदा सातत्याने विविध दाखल्यासाठी चकरा मारतात परंतु लिंकच्या समस्येमुळे कामे होत नसल्यामुळे कधीकधी आल्यापावली परत जातात तर कधी दिवसभर बसुनही त्यांचे काम होत नाही. दिलेल्या तारखेलाही त्यांचे काम होत नाही. सध्या शैक्षणिक वर्षाची सुरूवात झालेली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश तसेच शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावे लागतात त्यामुळे त्यांना विविध दाखल्यांची गरज पडते.

शेतीचे काम व मजुरी सोडून काही लोक विविध दाखल्यासाठी सतत चकरा मारतात पंधरा दिवस, महिन्यापासून त्यांचे दाखले मिळत नाही तरी अधिकारी वर्गांनी लिंक समस्येसाठी मूळ यंञणेकडे संपर्क त्वरित साधावा व त्वरित समस्या दुर करावी सर्व पालकांना, विद्यार्थ्यांना दिलेल्या मुदतीत सर्व दाखले व प्रमाणपत्रे मिळावी. कोणत्याही विद्यार्थ्यांचे शॆक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच दिलेल्या तारखेप्रमाणे प्रकरणे निकाली काढावी. नंतरच्या तारखेत आलेली प्रकरणे अगोदर निकाली काढू नये. या समस्येची गंभीरतेने दखल घ्यावी. नाहीतर जनतेचा असंतोष वाढत जाईल अशी जनतेतून मागणी होत आहे. कुणाचेही शॆक्षणिक भविष्य खराब होवू नये,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.