बाळदी येथील ग्रामसेवक ज्ञानोबा सूर्यवंशी यांची तात्काळ बदली करा…!

34

[प्रहार जनशक्ती शाखा बाळदी यांचे गटविकास अधिकारी यांना निवेदन]

✒️ सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.1 जुलै):- तालुक्यातील बाळदी ग्रामपंचायत अंतर्गत कार्यरत असलेले ग्रामसेवक यांची तात्काळ बदली करा….!

याबाबत बाळदी येथील ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्याकडे लेखी तक्रार करून ग्रामसेवक ज्ञानोबा सूर्यवंशी यांची त्वरीत बदली करण्याची मागणी केली आहे.

सूर्यवंशी ग्रामसेवक हे गावातील ग्रामस्थांना वर्तवणूक बरोबर न देणे, ग्रामपंचायतमध्ये वेळेवर हजर न राहणे, ग्रामपंचायत मध्ये कधीपण कुठल्याही शासकीय योजनेचा वेळेचा वेळापत्रक न लावणे, जर नागरिकांनी आवश्यक त्या कागदपत्रावर सही शिक्का मागतिला तर सही देतो शिक्का घरी विसरलो असे उडवा उडवीचे उत्तरे देतो.

ग्रामस्थांना अरेरावीची भाषा वापरतात, गावामध्ये रविवारी येणे व परस्पर ग्रामपंचायतमध्ये मिटींग घेणे,ग्रामसेवक हे गावातील ग्रामस्थांसाठी हितासाठी व गावाच्या विकासासाठी येणाऱ्या विविध शासकीय योजनेची माहिती जर विचारली तर उदा.महिला बालकल्याण,आदीवासी विकास योजना,अपंग कल्याण योजना, रोजगार हमी योजना या कल्याणकारी योजनाची माहिती ग्रामस्थांना कुणालाही माहिती देत नाही.

ग्रामसेवक हे स्वतः ग्रामपंचायत मध्ये मनमानी कारभार करत असतात त्यांच्या सोयीनुसार ते गावात येतात आणि कधीपण जातात त्यामुळे गावातील ग्रामस्थांना अनेक अडचणी व गैरसोयीचा सामना करावा लागत आहे व बेजबाबदार आपल्या कर्तव्याची जाणीव नसलेल्या या ग्रामसेवकाची तात्काळ बाळदी येथून बदली करून त्यांनी केलेल्या कारभाराची चौकशी करून व प्रशासकीय नियमानुसार पुढील कार्यवाही करावी.

अशी मागणी बाळदी येथील ग्रामस्थांनी आणि प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.यावेळी निवेदन देतांनी
प्रविण इंगळे, अविनाश दुधे, प्रफुल वानखेडे, शंकर हरण, सागर धुळे, प्रविण चिरडे,नितीन राठोड, राजकुमार भगत ,बंडू ठाकरे, प्रदीप भोसले, आदेश बेळतकर ,ओमकार हरण, सत्यपाल पोपलवाड, अतुल भोंग, दत्तराव सूरोशे, नारायण गिमेकर, दत्तराव वटाणे,आकाश धुळे संतोष घायर, किसन दरोले, विकास खिलारे, बालाजी भोसले सूर्यकांत वाढवे, किशोर पतंगे, रामदास पोटे, राजेश चव्हाण,अविनाश हरण, नारायण देशमाने, ओमकार हरण अभिषेक वटाणे, गजानन कदम, पवन वटाणे, बालाजी मिराशे, रवी चिरडे, सुनिल दुधे ,संजय बलखंडे हे उपस्थित होते.