” वऱ्हाड विकास “

38

वऱ्हाड विकास । वर्धापन दिन ॥
वाढविला मान । लेखनीचा ॥ १ ॥

वऱ्हाड विकास । प्रबोधन केले ॥
जन घडविले । शब्दांनीच ॥ २ ॥

वऱ्हाड विकास । सावित्री फुलेंचे ॥
शाहू विचारांचे । प्रसारक ॥ ३ ॥

सत्यशोधकांचा । महान विचार ॥
करितो प्रसार । मासिकच ॥ ४ ॥

बुद्ध – फुले – शाहू । आंबेडकरांचे ॥
परिवर्तनाचे । मासिक हे ॥ ५ ॥

वंचित समाज । राहू नये कोणी ॥
तेजस्वी लेखनी । मासिकात ॥ ६ ॥

विचारांच्या धारा । थोर पुरुषांच्या ॥
थोरांच्या तत्त्वांच्या । मासिकात॥७ ॥

वऱ्हाड विकास । समाज मासिक ॥
थोर संपादक । बनसोड ॥ ८ ॥

सत्यशोधकांचा । साहित्य प्रसार ॥
थोरांचे विचार । मासिकात ॥९ ॥

परिवर्तनाची । वाचावित गाणी ॥
विद्रोही लेखनी । मासिकात ॥ १० ॥

व्यसनमुक्तीचे । कार्य केले थोर ॥
करुनी प्रसार । मासिकात ॥ ११॥

वऱ्हाड विकास । हार्दिक शुभेच्छा ॥
मनस्वी सदिच्छा । जन्मदिनी ॥ १२ ॥

महात्मा फुले राज्यस्तरीय
आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त

✒️अभंगकार:-प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,रूक्मिणी नगर ,अमरावती,भ्रमणध्वनी:-८०८७७४८६०९