ब्रह्मपुरी येथे वीज बिल होळी आंदोलन

37

✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी, तालुका प्रतिनिधी)मो:-8888628986

ब्रम्हपुरी (दि.24 जुलै):- शुक्रवार ला विदर्भ राज्य आंदोलन समिती (V R A S) ब्रम्हापुरीचा वतीने म. रा.वी.वी.(M.S.E.B.) वर आंदोलन करण्यात आले.हे या आंदोलनात विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष वामनरावजी चटप यांनी आपली उपस्थिती दर्शविली . आंदोलन ब्रम्हपुरीचे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष सुदाम भाऊ राठोड यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या आंदोलनात अश्याप्रकारे ,लागडाऊन काळातील तीन महिन्याचे वीज बिल माफ करावे, ग्राहकांना दिलेली सर्व बिल वापस घेण्यात यावी, 200 युनिट पर्यंत वीज माफ देण्यात यावी, शेतीपंपा चे सर्व वीजबिल माफ करण्यात यावे, शेतकऱ्यांना पूर्णवेळ पूर्णदाबाची वीज देण्यात यावी, तात्काळ वीज कनेक्शन देण्यात यावे, विदर्भातील सर्व 120 तालुक्यातील भारनियमन कायमचे संपविण्यात यावे.

           अश्या सर्व मागण्या विदर्भ राज्यआंदोलन समिती (V R A S) ब्रम्हापुरी यांच्या वतीने करण्यात आल्या. या वेळेस उपस्थित असलेले विदर्भ राज्यआंदोलन समिती ब्रम्हपुरी चे अध्यक्ष सुधाम भाऊ राठोड ,फकिरा बाळसागडे, कुंदन लांजेवार, प्रज्वल वाघमारे, आकाश सोनार, बंडू मेश्राम , मारोती भाणारकर, सौ. सुधा राउत, गीता मेश्राम, लिना जोगे,पूजा शेडमाके, पूजा रावेकर उपस्थित होते.