विदेशी ब्राम्हण मनोहर भिडे यांच्या तोंडाला काळे फसणाऱ्यास पन्नास हजाराचे बक्षीस : ऍड. राहुल मखरे,बहुजन मुक्ती पार्टी, राष्ट्रीय महासचिव

45

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.1ऑगस्ट):-वारंवार बहुजन महापुरुषांचा अवमान करणारा विदेशी ब्राह्मण मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे यांच्या तोंडाला काळे फासणाऱ्या इसमास 50 हजारांची इनाम दिले जाईल असे जाहीर आवाहन बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव तथा कोरेगाव भीमा दंगल चौकशी आयोगाचे मुख्य वकील एडवोकेट राहुल मखरे यांनी केले आहे एडवोकेट मखरे यांनी तशा प्रकारे आवाहन त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये केले आहे.

भीमा – कोरेगाव दंगलीचा मास्टरमाइंड असलेला हा भिडे नेहमीच बहुजन महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून राज्यात अशांतता वातावरण निर्माण करत असतो त्याने पुन्हा एकदा अमरावतीत राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या बाबत वादग्रस्त वक्तव्य करत स्वतःच्या अकलेचे दिवाळी वाजल्याचे दाखवून दिले आहे यापूर्वीही त्याने राष्ट्रसंत तुकाराम महाराज यांच्याबाबत ही वादग्रस्त वक्तव्या केले होते एवढे नाही तर आंबा खाऊन मुले होतात अशा प्रकारे मुक्ताकडे उधळत भिडे ने स्वतःचे हास्य करून घेतले होते

वारंवार बहुजन महापुरुष व संतांचा अवमान करणाऱ्या या भिडे बाबत राज्य सरकार काहीच कारवाई करताना दिसत नाही त्यामुळे राज्यभरात राज्य सरकार व भिडेन विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे भिडेला वाचवण्याचे काम गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केले जात असल्याचे बोलले जात आहे खरं म्हणजे भिडे सारख्या विकृती माणसाला कधीच अटक करायला हवी होती मात्र त्याला पाठीशी घालण्यात येत असल्याने त्याचे फावले आहे दरम्यान मणिपूर हिंसाचारावरून केंद्रातील लोक आरएसएस भाजपा सरकारला जाब विचारत असल्याने त्या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी भिडेला पुढे करून त्याच्या तोंडातून वधवून घेतले जात असल्याची शंका उपस्थित केली जात आहे