जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक येथे राष्ट्रीय युवा धोरण व युवा विकास बैठक उत्साहात संपन्न

33

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.1ऑगस्ट):-महाराष्ट्र शासन , जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक तर्फे जिल्ह्यातील सर्व जिल्हा / राज्य / राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी आणि युवा सामाजिक विकास क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थेचे अध्यक्ष/सचिव यांची युवा विकास आणि युवा धोरण या विषयांवर सोमवार दि 31 जुलै 2023 रोजी दुपारी 2 वाजता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीसाठी तालुकास्तरीय अनेक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष , सचिव व इतर पदाधिकारी उपस्थित होते. मा. श्री अविनाश टिळे सर यांनी राष्ट्रीय युवा धोरण व युवा विकास कार्यक्रम याविषयी सविस्तर माहिती सांगितली. प्रथम आपण जिल्हास्तरीय संघटन स्थापन करून या कार्यक्रमाची बांधणी व उभारणी करू असे सुचित करण्यात आले . हळूहळू आपल्या जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये अशा संघटनांची बांधणी करू. तालुकास्तरीय ठिकाणी देखील हे राष्ट्रीय विकास धोरण व युवा विकास संघटन करून युवकांसाठी आपल्याला भविष्यात काय कार्य करता येईल याविषयी सर्वांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली

आदिवासी भाग व इतर ठिकाणी जे आत्महत्या, व्यसन ,अन्याय ,अत्याचार देखील वाढलेला आहेत. यासाठी युवकांनी त्यात सहभाग घेऊन मोलाचे कार्य करावे. या बैठकीसाठी पुरस्कारार्थी मोहंमद अरिफ खान,मनोहर जगताप,हेमंत काळे, वसंत राठोड, शहा हजर आली, अनिल निरभवणे,आश्विनी जगदाळे, डॉ.राजेश साळुंके, डॉ.सतिष साळुंके, सानिया खान इत्यादी उपस्थित होते.युवकांनी स्वतः पुढाकार घेऊन सहभाग नोंदविला पाहिजे. यासाठी सर्व सामाजिक संस्थांनी सहकार्य करावे , यासाठी सतत जिल्हा क्रीडा कार्यालय सर्वांसोबत सहकार्यासाठी सतत उपस्थित राहतील. असे आवाहन करण्यात आले.

याविषयी सविस्तर माहिती देऊन , अविनाश टिळे सर यांनी असेही सांगितले की ,आपण यासाठी धर्मादाय आयुक्त यांच्याकडे एक स्वतंत्र असे एन.जी.ओ. स्थापन करू आणि त्या एन.जी.ओ .मध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी , क्रीडा अधिकारी, एन.जी.ओ . प्रतिनिधी, जिल्हा / राष्ट्रीय पुरस्कारार्थी यामध्ये सदस्य म्हणून काम बघतील . सविस्तर चर्चा करून सर्वांनी यासाठी बहुमत व्यक्त केले. याच वेळी सर्व संस्थेच्या सभासदांनी या कार्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखविला. आपण सर्व मिळुन एकजुटीने कार्य करू असे जाहीर केले.

कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हा क्रीडा अधिकारी मा.सुनंदा पाटील मॅडम यांनी असे सांगितले की ,आपले हे कार्य सतत पुढे चालू ठेवावे आणि या कार्यासाठी पूर्ण जिल्हा क्रीडा कार्यालय सतत आपल्या सर्वांच्या पाठीशी सतत उभे राहील. हे कार्य आपण सर्वांनी एकत्र येऊन करूया असे आश्वासन दिले.अविनाश टिळे सर यांनी बैठकीचे प्रास्ताविक मांडले व कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांचे आभार मानले. याप्रमाणे आजची बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली.