भगवतीदेवी विद्यालयात लोकमान्य टिळक व अण्णाभाऊसाठे कार्यक्रम साजरा

58

✒️सिद्धार्थ दिवेकर(उमरखेड प्रतिनिधी)

उमरखेड(दि.1ऑगस्ट):- 2023 रोज मंगळवारला विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. प्रस्तुत कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रल्हादराव मिरासे तर प्रमुख अतिथी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक गौतम वाठोरे सर यांनी भूषविले प्रथमता मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी सर्व कर्मचाऱ्यांनी प्रतिमेचे पूजन केले व विद्यार्थ्यांनी कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

या लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर माने सर व प्रल्हादराव मिरासे यांनी अध्यक्षीय भाषणात आपले विचार व्यक्त केले. याचबरोबर विद्यालयातील विद्यार्थी प्रणिता कदम श्रद्धा वानखेडे तेजस्विनी पाईकराव श्रद्धा देवसरकर यांनी परिपाठाच्या माध्यमातून विचार व्यक्त केले. सदर कार्यक्रमास विद्यालयातील कर्मचारी दिगंबर माने राजेश सुरोशे अनिल अल्लडरवार भागवत कबले सौ. मीनाताई कदम कु.आरती देवसरकर विष्णू चव्हाण भागवत जाधव व विद्यार्थी वर्गाची बहुसंख्येने उपस्थित होती कार्यक्रम अतिशय भारदस्त झाला. सामूहिक प्रार्थना घेऊन कार्यक्रमाचा समारोप झाला.