प्रा.हरी नरके यांना उपेक्षित समाज महासंघ व कै.मैनाबाई बुंदेले प्रतिष्ठान तर्फे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन

109

✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अमरावती(दि.10ऑगस्ट):-महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य,भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे उपाध्यक्ष, अभिजात मराठी भाषा समितीचे समन्वयक, महात्मा फुले अध्यासन प्रमुख पुणे विद्यापीठ, सुप्रसिद्ध विचारवंत प्रा.हरी रामचंद्र नरके यांचे दि.9 ऑगस्ट 2023 ला वयाच्या साठाव्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांना उपेक्षित समाज महासंघ आणि कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान,अमरावती तर्फे श्रद्धांजलीपर कार्यक्रमाचे आयोजन दि 9 ऑगस्ट 2023 ला स्थानिक वऱ्हाड विकास येथे करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.श्रीकृष्ण बनसोड (अध्यक्ष, उपेक्षित समाज महासंघ), प्रमुख वक्ते प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले (अध्यक्ष, कै. मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान ), प्रमुख अतिथी श्री टी.एफ. दहिवाडे (अध्यक्ष,तथागत भूमी बहुउद्देशीय विकास संस्था, अमरावती) रवींद्र इंगळे ( पाटील), प्रा. सारिका बढे,श्री राहुल उंबरकर होते.अध्यक्ष, प्रमुख वक्ते व प्रमुख अतिथींच्या हस्ते सुप्रसिद्ध विचारवंत व संशोधक प्रा. हरी रामचंद्र नारके यांना हार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .

श्रद्धांजलीपर अध्यक्षीय भाषणातून प्रा. श्रीकृष्ण बनसोड यांनी,” प्रा.हरी नरके ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी वैचारिक लढा देणारे सेनापती होते. फुले-शाहू- आंबेडकर विचारधारेचे व्यासंगी अभ्यासक होते. त्यांच्या निधनामुळे फुले-शाहू- आंबेडकर चळवळीची अपरिमित हानी झाली. त्यांनी महात्मा फुले यांच्या क्रांतिकारी कार्यावर लिहिलेली अनेक पुस्तके हिंदी व इंग्रजी भाषेत भाषांतरीत झाली. त्यांनी महात्मा फुले यांचे विचार आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविले.”असे विचार व्यक्त केले.प्रमुख वक्ते प्रा.अरुण बुंदेले श्रद्धांजली अर्पण करताना म्हणाले की, “परिवर्तनवादी लेखक आणि विचारवंत प्रा.हरी नरके यांच्या निधनामुळे पुरोगामी चळवळ पोरकी झाली.

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. ओबीसींच्या प्रश्नावर त्यांचा फार मोठा अभ्यास होता. समता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी सत्ताधाऱ्यांना अनेक वेळा धारेवर धरले होते. महात्मा फुले यांच्या विचारांसाठी त्यांनी आयुष्य वेचले. त्यांच्या निधना मुळे समतेच्या चळवळीचे आघाडीचे शिलेदार आज
हरपलेले आहेत.”असे विचार व्यक्त केले.

प्रास्ताविक भाषणातून श्री पी. एफ. दहिवाडे यांनी” प्रा.हरी नरके यांच्या निधनामुळे बहुजन समाजाची फार मोठी हानी झाली.ती भरून काढणे अशक्य आहे.” असे विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे संचालन प्रा.सारिका बढे तर आभार कु.खुशी इंगळे ने यांनी मानले.कार्यक्रमाला तेलगू समाजाचे श्री मुन्ना बोनगीरे कु. तृप्ती पाटील, रामकुमार खैरे,मधुकर आखरे, शालिनी मांडवधरे, बी. जी. खोब्रागडे, सुभाष शिंदे व फुले-शाहू-आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते.