पुणे शिक्षक मतदार संघाची उमेदवारी नंदकिशोर गायकवाड यांना जाहिर

38

🔹महाराष्ट्र माध्यमिक डी.एड. शिक्षक महासंघाचे बैठकीत घोषणा

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.25जुलैै):-महाराष्ट्र माध्यमिक डी.एड. शिक्षक महासंघाचे झालेल्या कार्यकारिणीच्या सहविचार सभेमध्ये दोन विषय प्रामुख्याने हाताळले गेले एक म्हणजे शिक्षकांच्या न्याय्य हक्कासाठी आंदोलनात्मक भूमिका घेणे आणि दुसरा विषय म्हणजे महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या शिक्षक मतदार संघ व पदवीधर मतदार संघ मधून आपले उमेदवार उभे करणे आणि यानुसार पहिल्या विषयाला अनुसरून कार्यकारिणीने हा निर्णय घेतला की 25 तारखेला आपण सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना ई-मेल करणे समस्त शिक्षण क्षेत्रातील प्रशासनाला आपल्या अडचणीशी पुन्हा अवगत करणे आणि जर शासन-प्रशासन ऐकत नसेल तर 9 ऑगस्ट या क्रांतिदिनी उपोषणाला बसणे. याबाबत पत्र शासनाला देण्याचे ठरले. या क्षणी आंदोलन करणे हे संघटनेला गरजेचे झाले आहे कारण गेल्या चाळीस वर्षांपासून महाराष्ट्रभर पदवीधर डी एड शिक्षकांवर सातत्याने अन्याय होतो आहे .यावर्षी सुद्धा संघटनेने अनेक पत्र देऊनही अनेक जिल्ह्यातील शिक्षकांकडून येत असलेल्या तक्रारी वरुन संघटनेच्या हे लक्षात येत आहे की, अनेक शिक्षणाधिकारी चुकीच्या पद्धतीने पदोन्नतीला मान्यता देत आहेत.ज्यामध्ये सेवाज्येष्ठता सुद्धा तपासल्या जात नाहीत. आक्षेप असतील तर लक्षात घेतले जात नाही. शासनाने परिपत्रक आणि मार्गदर्शन देऊन देखील हा अन्याय सातत्याने सहन करावा लागत असल्यामुळे आंदोलनाचा निर्णय कार्यकारिणीने घेतला आहे. आणि याद्वारे समस्त डीएड व डी.एड.वेतनश्रेणीत लागलेल्या सर्व शिक्षकांना आव्हान करण्यात येते की आपण 9 ऑगस्टला आपल्या घरी बसून लाक्षणिक उपोषण करायचे आहे.
दुसरा विषय म्हणजे होऊ घातलेली पुणे शिक्षक मतदारसंघातील निवडणूक महासंघाने लढवण्याचे ठरवले असून या शिक्षक मतदार संघातून रयत शिक्षण संस्थेचे शिक्षक आणि संघटनेचे कार्याध्यक्ष व रयत सेवक मित्र मंडळाचे सचिव श्री नंदकिशोर गायकवाड सर यांच्या नावाची घोषणा महाराष्ट्र माध्यमिक डी.एड.शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्षा पद्मा तायडे आणि महासचिव बाळा आगलावे यांनी केली आणि या जाहीर घोषणेला कार्यकारिणीतील उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी आपला पाठिंबा दर्शविला. कार्यकारिणीच्या सभेमध्ये उपस्थित असलेले पदाधिकारी मुख्याध्यापक संजय देशमुख सर ,दिलीप पवार सर, संगीता गिरी मॅडम, प्रशांत सपकाळ सर ,धनगर सर, शहाबत हुसेन सर, आर डी पाटील सर ,खांबे सर, अर्जून दांडगे सर ,बंडुभाऊ धोटे सर, लक्ष्मण राठोड सर यांनी निवड झालेल्या भावी उमेदवारांना भरभरून शुभेच्छा दिल्या, व महाराष्ट्र माध्यमिक डीएड शिक्षक महासंघ ही निवडणूक लढवत असल्याबद्दल आज प्रथम उमेदवार श्री नंदकिशोर गायकवाड सर इतिहासाचं निश्चित पान ठरेल असे गौरवोद्गार सर्वांच्या तोंडून निघाले . महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानपरिषदेच्या सर्वच शिक्षक व पदवीधर मतदार संघातून संघटनेचे उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला.भविष्यात अनुदानित विनाअनुदानित या सर्व शाळा म्हणजे राष्ट्र घडवण्याचे पवित्र क्षेत्र आहे तेव्हा या पवित्र क्षेत्राला कुठल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही म्हणून शिक्षक व शिक्षण ,आणि विद्यार्थी व पालक या सर्वांचे हित जोपासण्यासाठी संघटनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याने कार्य करायला पाहिजे गरज पडेल तेव्हा आंदोलन उभे करायला पाहिजे .अशा प्रकारे निर्णय घेऊन या कार्यकारिणीच्या सभेची सांगता झाली.