🔹अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जालना जिल्हा अध्यक्ष नवनाथ आबा वाघमारे यांनी मानले आभार

✒️अतुल उनवणे(विशेष प्रतिनिधी-जालना/मुंबई)मो:-9881292081

जालना(दि.25जुलै:-ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल. ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही. अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री नामदार उद्धवजी ठाकरे यांनी दिली. असून ओबीसी समाज कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला विरोध करत नाही तसेच ओबीसी समाजावर ही मराठा समाजाच्या आरक्षणामुळे कुठलाही अन्याय होणार नाही.ओबीसीमहामंडळासाठी आर्थिक तरतूद करून जास्तीत जास्त मदत कशी देता येईल यासाठी प्रयत्न करण्यात येईल. मंत्रिमंडळातील सर्व सहकारी ओबीसींच्या मागणीसाठी सकारात्मक आहेत.असे महाराष्ट्र राज्याचे हेवीवेट नेते,ना. छगनरावजी भुजबळ यांनी सांगितले असल्याने मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे, आणि ओबीसींचे राष्ट्रीय नेते तथा राज्याचे हेवीवेट नेते,ना. छगनरावजी भुजबळ यांच्यासह महाविकास आघाडीतील नेत्यांचे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जालना जिल्हाध्यक्ष श्री.नवनाथ आबा वाघमारे यांनी आभार व्यक्त केले आहेत. मराठा आरक्षणाचा खटला सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात मान्य झाला तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागेल ही भिती ओबीसी समाजाला वाटते ती भिंती ओबीसी समाजाने मनातून काढून टाकावी मी अॅडवोकेट जनरल यांच्याशी चर्चा केली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणामुळे ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का बसणार नाही. याबाबत ओबीसी समाजाच्या शंका कुशंका आणि भीती दूर करण्यासाठी अॅडवोकेट जनरल (महाधिवक्ता) यांच्यासमवेत तुमची भेट घडवून आणू असे प्रतिपादन मुख्यमंत्री नामदार उद्धवजी ठाकरे यांनी केले. ओबीसी व भटके विमुक्तांच्या न्याय मागण्यासंदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सचे आयोजन केले होते. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. यावेळी ना. अशोकराव चव्हाण, ओबीसी समाजाचे राष्ट्रीय नेते,ना. छगनरावजी भुजबळ, ना.एकनाथजी शिंदे, ना. विजय वडेट्टीवार, ना. धनंजय मुंडे, मा.आ.प्रकाश शेंडगे, मा.आ.हरिभाऊ राठोड यांच्यासह ओबीसी चळवळीतले अनेक नेते व्हिडिओ कॉन्फरन्सींग मध्ये सहभागी झाले.
ना. ठाकरे म्हणाले, ओबीसींच्या हक्कासाठी सरकार तुमच्यासोबत आहे ओबीसींचे कोणतेच प्रश्न दुर्लक्षित राहणार नाहीत. मच्छीमारांसह, बारा बलुतेदार समाजाच्या प्रश्नाकडे ही लक्ष आहे. त्यांचे सर्वांचेच प्रश्न माहित आहेत. कोरोणा संकट हे जगावर आलेले महासंकट आहे. ते कोणत्याही एका समाजावरील संकट नाही. आज सर्व च्या सर्वच समाज संकटात आहेत. या कोरोणा संकटाची व्याप्ती खूप मोठी आहे. त्यामुळे सरकार म्हणून जपून पावले टाकावी लागत आहेत. ओबीसींच्या प्रश्नाची दखल मी यापूर्वी घेतली आहे. आपण सर्व मिळून कामही सुरू केले होते. अर्थसंकल्पातून चांगली स्वप्ने राज्यासाठी घेऊन आलो असताना कोरोणाचे महासंकट आले आहे. असे असले तरी ओबीसी समाजाचा एकही प्रश्न किंवा मुद्दा सोडून देणार नाही कोणत्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही विचारपूर्वक कायमस्वरूपी ठोस निर्णयाचे मी वचन देतो. ओबीसी समाजाला निश्चितच न्याय देणार. ठामपणे एक, एक पाऊल पुढे टाकत जात आहोत सरकारवर, माझ्यावर विश्वास ठेवा असे आवाहन ही मुख्यमंत्री ना. ठाकरे यांनी यावेळी केले. ओबीसी नेते,ना. छगनरावजी भुजबळ म्हणाले ओबीसी समाज कुठल्याही समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात नाही, आणि कुठल्याही समाजाच्या आरक्षणामुळे ओबीसी आरक्षणाला नुकसान होणार नाही अशी ग्वाही ना.भुजबळ यांनीही यावेळी दिली.

महाराष्ट्र, राजकारण, राजनीति, राज्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED