एका सक्षम बुद्धिजीवी प्राचार्याचे आत्मकथन-‘झाड आणि झेंडा’

110

डॉ.श्रीपाल सबनीस 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुणे अध्यक्ष यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा दि.6 ऑगस्ट 2023 रोजी संपन्न उमरखेड जि. यवतमाळ येथे झाला. वाचकाच्या उदंड प्रतिक्रिया व भडिमार आहे. हे विशेष म्हणावे लागेल.

*झाड आणि झेंडा* हे आत्मकथन तथा कादंबरी म्हणता येईल. याद्वारे लेखक प्राचार्य विठ्ठल नामदेव कदम यांनी आपल्या मराठवाडा (नांदेड) व विदर्भ (यवतमाळ) येथील सीमा भागातील नोकरी केली. याचे वास्तव आपल्या जीवनातील रंजक अनुभवातून अतिशय बोलक्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला. मानव जातीत जन्म घेऊन मानव होता आले तरी पुरे झाले. हे त्यांचे विधान त्यांच्या अंगी असलेल्या मानवी आणि वैचारिक मूल्यांचे आत्मभान प्रकट करते.

प्राचार्य वि.ना. कदम यांनी त्यांची जन्मभूमी वाळकी (बाजार) ता. हदगाव जि.नांदेड येथील आहेत त्यांचा जन्म19/07/ 1959 ला झाला. त्यांनी 1979 साली बी एड परीक्षा पास झाले व नोकरी करण्यास सुरुवात केली. तेथून त्यांचा संघर्षमय प्रवास चढता आलेखच राहिला प्राथमिक शिक्षक ते प्राचार्य पदावरून निवृत्त झाले. त्यांनी आपल्या गावचा इतिहास गावाची रचना तेथील चालीरीती एका गावातील सामान्य माणूस ते गर्भश्रीमंत माणूस कशा पद्धतीने वागतात बोलतात चालतात याचे ज्वलंत उदाहरण त्यांनी अतिशय सोप्या पद्धतीने मांडणी केली आहे. खरोखर जुन्या काळात कितीतरी सुविधाचा अभाव होता. जसे देशाला स्वातंत्र्य मिळाले तसेच सुधारणा होत आहे. व या सुधारणा अखंड चालूच राहतील.

लेखकाचे मूळ प्रथमिक शिक्षण गाव व गावाजवळील आष्टी ता. हदगाव जि. नांदेड येथे माध्यमिक शिक्षण झाले. नंतर नांदेड या ठिकाणी उच्च शिक्षण घेतले. मध्यंतर अडथळा आला त्यावेळेस अडाणी आईचे शैक्षणिक बोल…

*मास्तर गरीबाच्या पोराला चांगलं शिकवा? त्याला भेडवू नका मोठ्याची मुलं शिकतील आमची कवा शिकणार? शाळेत तर येऊ द्या गरिबाच्या लेकराची काळजी घ्या एवढीच तुम्हाला इनंती…!*आई यमुनेचे बोल…! जवळची शाळा नको दूरची पाहिजे त्यावेळेस वडिलांचे बोल…!*शिकायचं असेल तर आष्टीला शिक नाहीतर आपल्या शेतावर चाल*…!शेतीचे परिश्रम लेखकाने अनुभवले होते. त्यामुळे आष्टी येथे जून 1969 ला प्रवेश निश्चित केला. लेखकाने अनुमान काढला उच्चशिक्षित शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावा म्हणजे विद्यार्थ्यांचा विकास होणार….! लेखक प्राचार्य वि.ना. कदम यांनी खेळण्याच्या गमंतीजमंती व लेखकातील खेळांचे कौशल्य त्यांचा सभाधीटपणा त्यांना खेळताना हात मुरपणे वैदाने हिम्मत दिली.

*अहो मर्दालाच मार लागतो बाईला थोडाच लागणार काळजी करू नका तीन दिवसात हातबरा करतो असे त्यांनी लेखकाला हिम्मत दिली एकंदरीत कबड्डी हॉलीबॉल खो-खो पोहणे व्यायामाचा छंद यामध्ये लेखक पारंगत होते. विद्यालयात माझी गैरहजेरी होती. त्यावेळेस मुख्याध्यापक स्वतः जातीने घरी आले. मुलगा हुशार आहे. अचानक मधूनच शाळा बंद करू नका…! त्याला उद्यापासून शाळेत पाठवा त्यामुळे माझ्या विचारात बदल झाला व पुन्हा पूर्ववत शाळा सुरू केली. जि.प. हायस्कूल आष्टी येथे येणे जाणे सुरू झाले. जाते येते वेळस थट्टा मस्करी भांडण बोलणे मज्जाक खोड्या करणे चालू होते.
मग जत्रेला जाणे सर्व मित्रमंडळींनी ठरवले तर पैसा नाही तर घरच्याच वावरातील मित्रमंडळीने कापूस वेचून आणणे व ती चोरी पकडण्यात आली व सर्वांची दमछाक झाली. जत्रा नाही तर शेतीची कामे करावी लागत होती. ती करत करत गुरा वासरांची व्यवस्था करणे लेखकाला आवडत होते. त्याचबरोबर गावातील बारा बलुते सुतार मातंग लोहार माथाडी गवंडी म्हणजेच प्रत्येक व्यवसायिकाचे काम शिकण्याचा छंद होता तो छंद त्यांनी मनापासून जोपासला एखाद्या व्यक्तीने कामाची जबाबदारी टाकली तर ती नीटनेटकेपणाने करणे याची मला आवड होती. असे लेखकाचे मत होते.

त्याचबरोबर महाविद्यालयीन जीवनातील कडू गोड अनुभव शेअर त्यांनी केले. महाविद्यालयात वर्ग प्रतिनिधीची निवडणूक अतिशय रंजकपणाने मांडली महाविद्यालयाचे मित्रमंडळी कशी मदत करतात कोण कसे जात पात धर्म गरिबी यामधून कसे शिक्षण घ्यावे लेखकाचा सर्वात जवळचा मित्र *सुभाष राजेवार* यांची अतुलनीय मदत त्यांचे नाव विशद केले. सायन्स कॉलेज नांदेड शासकीय अध्यापक महाविद्यालय, नांदेड पास व नोकरी मिळवण्यासाठी धडपड कसे प्रयत्न करावे. याचे जोरदार किस्से त्यांनी सांगितले आहेत.

शिक्षकी पेशाची सुरुवात 1979 च्या जुलै महिन्यात कामारी येथे नोकरी मिळाली एका वर्षात विद्यालयाचा चेहरा मोहरा बदलला त्यानंतर समर्थ विद्यालय, पिंपरखेड. इथे दोन वर्षे नोकरी केली. पण विद्यालयात मनासारखी वाटले नाही. मुख्याध्यापका सोबत मतभेद झाले. त्याची सविस्तर मांडणी केली. निसर्गाचे अनमोल ज्ञान शाळा करत शेती करणे शेतीची आवड घरची परिस्थिती प्रतिकूल आहे. आई-वडील अडाणी तीन भाऊ तीन बहिणी कुटुंबातील प्रमुख व्यक्तिमत्व म्हणजे प्राचार्य वि.ना. कदम यांच्यावर जबाबदारी होती. पण विहीर खोदत असताना दीड फुटावरच पाणी लागले व शेती समृद्ध होण्यास मदत झाली. लग्नाचा प्रसंग स्वतः प्राचार्य वि.ना. कदम रंगाने सावळे आहेत पण पत्नी गोरी पाहिजेत होती पण कृष्णवर्णीय मिळाली किंवा केव्हा वाटे लग्नच करूच नाही पण 25/ 05 /1981 ला लग्न झाले. शिवाजी शिक्षण संस्था पुसद येथे मुलाखत जुलै 1982 ला चातारी ता.उमरखेड येथे नोकरी मिळाली पत्नीचे पायगुण लागले. आणि सलग नऊ वर्षे नोकरी केली.

चातारी गावाने सर्व काही दिले. विशेष माझे व बापाचे मामाचे गाव चातारी या ठिकाणी लेखकाला क्रीडा क्षेत्रात आनंद मिळाला. त्यामुळे हॉलीबॉल कबड्डी व्यायाम पोहणे या सर्व गोष्टीचा लाभ मिळाला तरी पण पगारी नोकरी सोडून उमरखेड येथे प्राध्यापकाची विनाअनुदान नोकरी स्वीकारली व पुढे पुढे प्राचार्य म्हणून गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्याल, उमरखेड येथुन सेवानिवृत्त झालो.

लहान बहिणी इंदूचे लग्न स्वतःच्या कर्तव्यावर करून दाखविले पण पाहिजे तसे वडिलांचे सहकार्य मिळाले नाही. पण इंदूचे सर्व काही व्यवस्थित झाले. याचा मला आनंद आहे. हे सार करत असताना भावाला शिक्षणासाठी आर्थिक मदत करावी लागत होती. भाऊ पुण्याला एल एल बी करत होता. पुढे तो न्यायाधीश होऊन सेवानिवृत्त झाला.

प्राचार्य वि.ना. कदम यांनी विनाअनुदान कॉलेजवर प्राध्यापक म्हणून नोकरी स्वीकारली व विज्ञान शाखेला अनुदान येण्यासाठी सात वर्षाचा कालावधी लागला. त्यामध्ये सर्वप्रथम विद्यार्थी गोळा करणे त्यांना शिकवणे मोजका पगार घेणे कोणाचे सहकार्य नाही. या सगळ्या गोष्टीवर त्यांनी पूर्णतः मात केली. हे विशेष म्हणावे लागेल कमी खर्चामध्ये निसर्गमय विद्यार्थ्यांच्या सहली काढल्या त्याचबरोबर उमरखेड परिसरात समाज प्रबोधनाचे कार्य त्यांनी केले. नेमक्या पगारामध्ये माजी प्राचार्य डॉ. डावळे सर यांनी सल्ला दिला किमान आपले तालुक्याच्या ठिकाणी घर असावे पण कोणतीही बँक कर्ज देत नव्हती प्रायव्हेट एचडीएफसी बँकेकडून कर्ज घेतले व छोटे मोठे घर उभे केले. भाड्याच्या घरात एक वेळेस मोठा साप निघाला त्या संकटाची सारवा सारव मी पूर्णतः केली. माझे महाविद्यालय हे पूर्णतः विकसनशील झाले. पाहिजे यासाठी मी पूर्णतः झपाटलो होतो व झपाटून महाविद्यालयाचा सर्वांगीण विकास केला. याचा मला आनंद वाटतो.

अतिशय आनंदाची बाब म्हणजे 1987 मध्ये अमरावतीचे कुलगुरू डॉ .एस.टी. देशमुख साहेब यांनी नुकत्याच अमेरिका दौरा करून आले होते व महाविद्यालयाचे संजीवक डॉ. आत्माराम गावंडे यांच्याकडे ते राहून आले होते. डॉ. गावंडे यांनी कुलगुरू देशमुख साहेब जवळ गावंडे महाविद्यालयाच्या प्रगती विषयी तळमळ व्यक्त केली होती.त्या पार्श्वभूमीवर कुलगुरू साहेब नांदेड वरून जाताना महाविद्यालयाच्या भेटीवर आले होते. भेटी समयी त्यांनी डॉ.या.मा.राऊत साहेब होते त्या दिवशी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डावळे हे महाविद्यालयात उपस्थित नव्हते व महाविद्यालयांमध्ये कुलगुरू यांचे मी समाधान केले. व 2003 मध्ये पीएचडी अवार्ड झाल्यानंतर पुढे आपल्याच महाविद्यालयात प्राचार्य होता येईल याचा मी विचार करू लागलो व ते स्वप्न माझे पूर्णत्वास आले.

*झपाटलो होतो आम्ही, उत्कृष्ट व्हावे महाविद्यालय! विद्यार्थी घडावेत येथे,व्हावे सर्वांचे महाविद्यालय!!*
व त्यानुसार महाविद्यालयाच्या लौकिक झपाट्याने वाढू लागला व महाविद्यालयाची प्रगती अमरावती विभागात पूर्णपणे लोकांना कळली होती. त्यामुळे माझे समाधान होते. महाविद्यालयात काही बारीक सारीक घटना झाल्या होत्या त्यावेळेस प्राध्यापकाच्या रूपाने आमच्या महाविद्यालयातील टीमने पूर्णतः मात केली होती. महाविद्यालय हे दोन शिफ्ट मध्ये होते. त्यावर मार्ग काढून पूर्ण महाविद्यालय एका शिफ्ट मध्ये केले. शिफ्ट बदलल्यामुळे विद्यार्थ्यांचे आंदोलन झाले. त्यावरही मार्ग काढला महाविद्यालयात ड्रेस कोड नव्हता प्राध्यापकामध्ये नव्हता व सर्वांनी मिळून ड्रेस कोड केला. त्यामुळे कॉलेजची उंची वाढली. विशेषता पूर्ण परिसराची स्वच्छता केली. काही वेळा बेकार विद्यार्थ्यांनी मुलींची छेडछाड प्रकरण आले होते. त्यावरही विद्यार्थ्यांना समजावून सांगितले व त्यांनी ऐकले. मी वनस्पतीशास्त्राचा प्राध्यापक असल्यामुळे झाडे लावा झाडे जोपासा हा मूलमंत्र सर्वांना दिला व वेगवेगळ्या वृक्ष वनस्पतीची लागवड केली. एका प्रसंगात अध्यक्ष महोदयांनी माझ्या सयमाची परीक्षा घेतली व त्या परीक्षेत मी चांगल्या गुणांनी पास झालो.

पालकत्वाची माझी भूमिका अतिशय जबाबदारीने पार पाडली. पालकांच्या तक्रारीचे पूर्णतः समाधान केले. एवढे करत असताना एक दुर्दैवी घटना घडली त्यामध्ये एक प्राध्यापक व विद्यार्थी अपघातामध्ये मृत्यू पावले. याचे मला सदैव दुःख जाणवते हे मी कधीही विसरू शकत नाही. कॉलेजमध्ये दरवर्षी वार्षिक स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणे हा माझा छंद होता तो छंद मी पूर्णपणे जोपासला. माझे वंश सातत्याचे आधार याचीही मी पूर्णपणे जबाबदारी स्वीकारली माझी आजी हिराबाई तुकाराम कदम. यांची मी पूर्णतः काळजी घेतली. माझ्या आई-वडिलांचे सर्वांचे सुखदुःख जाणले. विशेष सहकारी माजी धर्म पत्नी सौ.रंजनाताई विठ्ठल कदम यांनी माझे कार्य समजून घेतले. कोणताही रथ असो त्या रथाचे एक चाक म्हणजे पत्नी असते व ती पूर्णपणे माझ्या पत्नीने साथ दिली.त्याचा मला अभिमान वाटतो त्या अभिमानातूनच मी सारे काही करू शकले.ही सर्व शक्ती प्रेरणा आणि प्रतीके माझ्या खेडेगावातून वडीलधाऱ्या माणसातून कोरडवाहू शेतीतून मला मिळालेली आहे.
माझ्या पुस्तकाचे नाव झाड आणि झेंडा झेंड्याच्या आकर्षण प्राथमिक शाळेपासून आकर्षित होते. याचा मला हे अभिमान आहे. म्हणून मी माझ्या आत्मकथनाला झाड आणि झेंडा हे शीर्षक दिले आहे.

*झाड आणि झेंडा* (आत्मकथन)
लेखक: प्राचार्य वि.ना. कदम
महामेरू ता.उमरखेड जि. यवतमाळ
सुदर्शन
प्रकाशन: उमरखेड
मुद्रक: सुदर्शन प्रिंटर्स उमरखेड

अक्षर जुळवणी: वरदायणी झेरॉक्स उमरखेड.
पृष्ठ 200 मूल्य 250.
संपर्क:8411064866.

✒️शब्दांकन:-दिगंबर चंपतराव माने शिक्षक भगवतीदेवी विद्यालय, देवसरी उमरखेड यवतमाळ,9404412886.