दीपज्योती नेत्र रुग्णालय उदगीर व जनाई नेत्र रुग्णालय गंगाखेड हे नेत्र रुग्णासाठी वरदान

64

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.24ऑगस्ट):-दीपज्योती नेत्र रुग्णालय उदगीर येथील डॉ. ज्योती दिपक सोमवंशी यांच्या हस्ते एक लाख रुग्णांची यशस्वी शस्त्रक्रीया पार पडल्या यात सर्व रुग्णांना दृष्टी देऊन त्यांच जीवन आनंदीमय करण्यात आले आहे.

तसेच जनाई नेत्र रुग्णालय गंगाखेड येथील डॉ. महेश विजयकुमार समगे यांच्या रुग्णालया मार्फत अकरा हजार रुग्णांची यशस्वी शस्त्रक्रीया पार पडल्या असून जनाई नेत्र रुग्णालय गंगाखेड यांच्या मार्फत रुग्णांना अल्प दरात सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

तसेच रुग्णासाठी मोफत तपासणी चे शिबीर घेण्यात आले या शिबिरात जवळपास 130 शिबीर घेण्यात आले असून या शिबिरात चौदा हजार रुग्णांची तपासणी करण्यात अली आहे.तसेच शस्त्रक्रीया झालेल्या रुग्णांना अल्प दरात चे चेष्मा देण्यात येतो.व रुग्णांची पूर्ण काळजी घेण्यात येते.