अनुसूचीत जाती व जमातींच्या महापरिवर्तन मेळाव्यास लाखोंचा जनसागर उपस्थित राहाणार – विवेकराव कांबळे यांची

529

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.6सप्टेंबर):-सांगली जिल्हा अनुसूचीत जाती व जमाती महापरिवर्तन मेळावा समितीच्या वतीने सांगली सर्किट हाऊस येथे अनुसूचीत जाती व जमातीच्या प्रतिनिधींची महत्वाची बैठक आयोजित करणेत आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अनुसूचीत जाती व जमाती महापरिवर्तन मेळाव्याचे अध्यक्ष मा. विवेकराव कांबळे उपस्थित होते.
यावेळी प्रथम सर्व महापुरूषांना अभिवादन करून बैठकीची सुरवात करणेत आली. बैठकीला उपस्थित मान्यवरांचे स्वागत व प्रास्तविक मा. मिलिंद मेटकरी सर यांनी केले.

यावेळी अनुसूचीत जाती व जमाती महापरिवर्तन मेळाव्याच्या संदर्भात मा. जगन्नाथदादा ठोकळे, मा. शर्वरी पवार, मा. रविंद्र कांबळे, मा. अशोकराव पवार, मा. बाळासाहेब भंडारे, मा. प्रमोद इनामदार, मा. राजेंद्र खरात, मा. संजय कांबळे, मा. स्नेहल सावंत, मा. तुषार लोंढे, मा. सुरेश दुधगावकर, मा. बिरेंद्र थोरात, मा. महेंद्र गाडे, मा. उद्य घाडगे, मा. रूपेश तामगावकर, मा. चंद्रकांत केंगारे, मा. आकाराम सकते, मा. अर्जुन कांबळे, मा. विद्या कांबळे, मा. शंकरलाल परदेशी, मा. शंकर माने, मा. सरस्वती चौगूले, मा. राजेंद्र जावळे, मा. संदिप ठोंबरे, मा. उत्तमराव कांबळे, आदी मंडळींनी मार्गदर्शन करून विवीध सुचना केल्या.

यावेळी मा. विवेकरावजी कांबळे साहेब मार्गदर्शन करताना म्हणाले, अनुसूचीत जाती व जमाती महापरिवर्तन मेळावा हा ६९ अनुसूचीत जाती व ४७ अनुसूचीत जमाती या समाजाला एकत्रित करून संपन्न होणारा महामेळावा असणार आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतातील हा पहीला यशस्वी प्रयोग असणार आहे. या मेळाव्याची बातमी इतरत्र समजताच प्रस्थापित लोकांचे धाबे दनाणले आहेत. भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे उलटली तरी देखील येथील अनुसूचीत जाती जमाती या समाजामध्ये असणार्या समस्या जैसे थे अवस्थेत आहेत. तरी सध्याचा अनुसूचीत समाज गप्प बसणारा नसून तो स्वतःच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणारा समाज म्हणून उदयास येत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तसेच इतर महापुरूषांची शिकवण ध्यानात घेऊन मार्गक्रमण करणार्या या समाजाला आज पर्यंत प्रस्थापितांनी विवीध सामाजिक, सार्वजनिक, राजकीय व्यवस्थेत कायमच उपेक्षित ठेवले आहे. म्हणून ३० सप्टेंबर २०२३ रोजी आयोजित अनुसूचीत जाती व जमाती महापरिवर्तन मेळाव्यामध्ये लाखोंच्या संख्येने अनुसूचीत समाज उपस्थित राहणार आहे व प्रस्थापित समाजव्यवस्थेला आव्हान करणार आहे या मध्ये कोणती शंकाच नाही. अनुसूचीत जाती व जमाती महापरिवर्तन मेळाव्यामध्ये अनुसूचीत जाती व जमाती चे प्रतिनिधित्व करणार्या नेत्यांना आमंत्रण करणेत आले असून सर्व अनुसूचीत समाजातील समस्या मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून सदर मेळाव्यामध्ये मार्गदर्शन होणार आहे. म्हणून अनुसूचीत समाजाच्या प्रतेक पदाधिकार्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी आपआपल्या कार्यक्षेत्रामध्ये सदर मेळाव्याचा जागर करायचा आहे.

शक्य होईल तीथे बैठका आयोजित करून अनुसूचीत जाती जमाती मध्ये अनुसूचीत जाती व जमाती महापरिवर्तन मेळाव्यासंदर्भात माहीती देऊन जास्तीत जास्त प्रमाणात अनुसूचीत समाज मेळाव्यास उपस्थित राहण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचा आहे. मेळाव्यास येणार्या समाजबांधवांस कोणत्याच पद्धतीची अडचणी होणार नाहीत याची सर्व कार्यकर्त्यांनी दक्षता घ्यायची आहे. मेळाव्यास उपस्थित राहणार्या समाजबांधवांना वाहतूक, पाणी, जेवण इतर बाबींची योग्य पद्धतीचे नियोजन करून द्यावे. सदर मेळावा हा उपेक्षित अनुसूचीत जाती जमाती च्या न्याय हक्कासाठी असून या मेळाव्याच्या माध्यमातून अनुसूचीत जाती जमातीची प्रगतीच्या दिशेने मार्गक्रमण होत आहे हे सिद्ध होणार आहे.

महापरिवर्तन महामेळाव्याच्या दृष्टिकोनातून मेळाव्याचे ठिकाण ठरवले असून सांगली येथील नेमिनाथ नगर येथील क्रिडांगणावर अनुसूचीत जाती व जमातीचा महामेळावा संपन्न होणार आहे. सांगली जिल्ह्यातील सर्वच दहा तालुक्यांमध्ये या मेळाव्या संदर्भात जनजागृती करणार असून लाखोंच्या संख्येने अनुसूचीत बंधू-भगीनी या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. जवळपास १०६ जाती व जमातीचे बांधवांना महापरिवर्तन मेळाव्याच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचा यशस्वी प्रयत्न या ठिकाणी संपन्न होणार आहे.

बैठकीच्या शेवटी मा. सतिश मोहिते यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले.

यावेळी मा. अशोक कांबळे, मा. पोपट कांबळे, मा. श्वेतपद्म कांबळे, मा. योगेंद्र कांबळे, मा. आशा साबळे, मा. भारत ऐवळे,मा. अरूण आठवले, मा. प्रतिक देवमाने, मा. रविकुमार गवई, मा. शिवाजी देवमाने, मा. चंद्रकांत कांबळे, मा. नवनित लोंढे, मा. सुरेश कांबळे, मा. रणजीत ऐवळे, मा. अरविंद कांबळे, मा. नंदकुमार कांबळे, मा. प्रभाकर नाईक, मा. आलका भंडारे, मा. रोहीणी कांबळे, मा. नितेश वाघमारे, मा. अभिजीत आठवले, मा. अविनाश कांबळे, मा. पृथ्वीराज रांजणे, मा. धनंजय वाघमारे, मा. जितेंद्र सोरटे, मा. पिंटू माने, मा. प्रविण धेंडे, मा. दिनकर धेंडे, मा. संजय मस्के, मा. दादासो चंदनशिवे, मा. संदिप हात्तेकर, मा. संजय एम. कांबळे, मा. आत्माराम सकटे, मा. सुधीर कांबळे, मा. स्वप्निल सौदागर, मा. सुनील तोरणे, मा. हनमंत खिलारे, मा. रूपेश खिलारे, मा. आदी लोंढे, मा. विशाल काटे, मा. दिपक सावंत, मा. दिलीप जाधव, मा. विकास कांबळे, मा. विशाल कांबळे यांचे सह मोठ्या संख्येने अनुसूचीत समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.