मोर्शी वरूड तालुक्यातील 27 जिल्हा परीषद शाळांभोवती होणार संरक्षण भिंत !

180

🔹आमदार देवेंद्र भुयार यांनी उपलब्ध करून दिला 3 कोटी रुपयांचा निधी !

✒️मोर्शी(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मोर्शी(दि.6सप्टेंबर):-जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींची अवस्था दयनीय म्हणून पाहिली जाते. शिवाय शाळांना संरक्षण भिंत नसल्याने मोकाट गुरांच्या त्रासापासून शाळा परिसरात अतिक्रमण झाल्याचे चित्र प्रत्येक शाळेत पाहावयास मिळते. यामुळे शाळांना संरक्षण भिंत उभारणीचा प्रश्‍न अनेक वर्षांपासून रेंगाळत असल्यामुळे आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शी वरूड तालुक्यातील 27 शाळेच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्यासाठी 3 कोटी 8 लक्ष रुपये मंजूर करून दिले आहे.

जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळांना संरक्षण भिंत नाही त्यामुळे शाळांभोवती अतिक्रमण वाढले आहे. शाळांभोवती संरक्षण भिंत उभारण्यासाठी रोजगार हमी योजनेतून आमदार देवेंद्र भुयार यांनी निधी मंजूर केलेला आहे. त्यातून साधारण 27 शाळांना संरक्षण भिंत बांधण्याचे काम पूर्ण होणार आहे. यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षात शाळा संरक्षित करण्यात येणार आहेत. जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींची अवस्था दयनीय म्हणून पाहिली जाते. शिवाय शाळांना संरक्षण भिंत नसल्याने मोकाट गुरांच्या त्रासापासून शाळा परिसरात अतिक्रमण झाल्याचे चित्र प्रत्येक शाळेत पाहावयास मिळते.

यामुळे शाळांना संरक्षण भिंत उभारणीचा प्रश्‍न अनेक वर्षांपासून रेंगाळत होता. दरम्यान, आमदार देवेंद्र भुयार यांनी या कामाला गती देऊन सदरची कामे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत करण्याचे नियोजन आखले. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर मोर्शी वरूड तालुक्यातील पहिल्या टप्प्यातील २७ शाळांच्या याद्या सादर करण्यात आल्या होत्या. अनेक वर्षांपासून रेंगाळले काम महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत अभिसरण आराखड्यानुसार मोर्शी वरूड तालुक्यातील शाळांसाठी संरक्षकभिंत बांधण्यासाठी अंदाजपत्रकानुसार प्रस्ताव मागवून आमदार देवेंद्र भुयार यांच्या विशेष प्रयत्नांमुळे 27 शाळांच्या संरक्षकभिंत बांधकामाला 3 कोटी 8 लक्ष रुपये मंजूर करून तांत्रिक मान्यता देण्यात आली असून लवकरच कामांना प्रत्यक्ष सुरवात करण्यात येणार असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी सांगितले.

अभिसरण योजने अंतर्गत मोर्शी वरूड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना संरक्षण भिंत मंजूर करण्यात आली असून त्यामध्ये मोर्शी तालुक्यातील तळणी जि.प. शाळा 6 लक्ष रु, पारडी जि.प.शाळा 24 लक्ष 21 हजार रु, दापोरी जि.प. शाळा 18 लक्ष 44 हजार रु, दुर्गवाडा जि.प. शाळा 3 लक्ष 92 हजार रु, पिंपळखूटा मोठा जि.प.उर्दू शाळा 2 लक्ष 32 हजार रु, पिंपळखूटा मो. जि.प.शाळा 19 लक्ष 34 हजार रु, अंबाडा जि.प. उर्दू शाळा 9 लक्ष 74 हजार रु, अंबाडा जि.प. म. शाळा 9 लक्ष 82 हजार रु, अंबाडा जि.प. शाळा 9 लक्ष 81 हजार रु, खेड जि.प. उर्दू शाळा 6 लक्ष 1 हजार रु, वरूड तालुक्यातील घोराड जि.प. शाळा 15 लक्ष 70 हजार रु, पांढरघाटी जि.प. शाळा 6 लक्ष 6 हजार रु, परसोडा जि.प. शाळा 15 लक्ष 9 हजार रु, लिंगा जि.प. शाळा 5 लक्ष 43 हजार रु, खापरखेडा जि. प. शाळा 19 लक्ष 13 हजार रु, भेमडी मोठी जि.प. शाळा 7 लक्ष 72 हजार रु, आलोडा जि.प. शाळा 15 लक्ष 70 हजार रु, टेंभुरखेडा जि.प. शाळा 12 लक्ष 68 हजार रु, पवणी जि.प. शाळा 17 लक्ष रु, जामठी जि.प. शाळा 7 लक्ष 11 हजार रु, सातनूर जि.प. शाळा 7 लक्ष 76 हजार रु, रवाळा जि.प. शाळा 17 लक्ष 53 हजार रु, भवानी डोह जि.प. शाळा 13 लक्ष 52 हजार रु, जामगाव (ख.) जि.प. शाळा 9 लक्ष 97 हजार रु, बाहादा जि.प. शाळा 9 लक्ष 40 हजार रु, ममदापुर जि.प. शाळा 7 लक्ष 2 हजार रु, खानापुर जि.प. शाळा 17 लक्ष रु, या सर्व शाळांच्या संरक्षक भिंतिकरिता 3 कोटी 8 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहे.