H2H सर्वे संदर्भात उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांची तहसील कार्यालय येथे आढावा बैठक संपन्न !…

128

🔹धरणगाव पॅटर्न संपूर्ण जिल्हयात राबवणार – डॉ. श्रीकुमार चिंचकर

✒️विशेष प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगांव(दि.6सप्टेंबर):- तहसील कार्यालय धरणगाव येथे H2H ( हाऊस टू हाऊस ) सर्वे संदर्भात उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांची आढावा बैठक उत्साहात संपन्न झाली. या बैठकीत उपजिल्हाधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर यांच्या शुभहस्ते BLO [ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ] यांना नवीन ओळखपत्र वाटप करण्यात आले.

यानंतर बी.एल.ओ.ची आढावा बैठक घेतली निवडणूक कामी H2H सर्वे, मयत मतदार, दुबार मतदार, अपंग मतदार, ब्लर फोटो या सर्वांची विस्तृत अशी माहिती घेतली आदर्श बी.एल.ओ ज्ञानेश्वर पाटील, पी.डी.पाटील तसेच सर्व बी.एल.ओ यांचे कामाचे कौतुक करून अभिनंदन केले. धरणगाव पॅटर्न संपूर्ण जिल्ह्यात राबवणार असे आश्वासन दिले.

याप्रसंगी तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, नायब तहसीलदार सी.बी.देवराज, गटशिक्षणाधिकारी डॉ.भावना भोसले, लिपीक महेंद्र ( पिंटुभाऊ ) पवार तसेच आदर्श बी.एल.ओ. ज्ञानेश्वर पाटील, पी.डी. पाटील, मनोहर मोरे, समाधान पाटील, जालंदर पाटील, लक्ष्मण पाटील तसेच तहसील कार्यालयाचे कर्मचारी वृंद उपस्थित होते.