गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयाची सेवा लय भारी चार वर्षापासून खोकल्याचे औषध उपलब्ध नाही

148

🔹औषध पुरवठा करण्याची माजी नगरसेवक अमान्नुल्ला काका यांची मागणी

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.6सप्टेंबर):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने जनहिताय योजना लक्षात घेता सर्वसामान्य पर्यंत प्रत्येक योजना पोहोचत नसल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रत्येक योजना अंमलबजावणी हवी या उद्देशाने “शासन आपल्या दारी “उपक्रम राबवत असून जनसामान्य माणसाला योजनेचा फायदा मिळवून दिला जात आहे.परंतु गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात नागरिकांना सेवा देताना साधा “खोकला “आजार असणाऱ्या व्यक्तींना औषध दिल्या जात नाही त्यावर गोळ्या घेतल्या जात आहेत संबंधित विभागाची चर्चा केली असता “आमच्या विभागामध्ये औषध नाही कुठून देऊ “असं उत्तर ऐकायला मिळालं.

त्यामुळे शासन आपल्या दारी खरंच आहे का असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे. उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड येथे गंगाखेड,पालम,सोनपेठ तालुक्यासाठी प्रमुख असल्यामुळे ग्रामीण भागातून जनता उपचाराकरिता येत असते. मोठा दवाखाना लक्षात घेता उपजिल्हा रुग्णालयात एक्स-रे खोकला औषध इतर सुविधा मिळत नसल्यामुळे खेडेगावातील जनता दुसरी वेळेस येत नसल्याचे दिसून येत आहे.

उपजिल्हा रुग्णालयाच्या गैरसोई लक्षात घेता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक अमानूल्ला काका यांनी प्रत्यक्ष चौकशी करत एक्स-रे मशीन व खोकला औषध विभागाशी चर्चा केली असता संबंधित विभागातून सुविधा मिळत नसल्याचे दिसून आले शासनाच्या वतीने शासन आपल्या दारी सुविधा देत असताना दहा रुपयाची चिठ्ठी बंद करण्यात आली परंतु सुविधा देत असताना संबंधित ऑफिसच्या प्रवेशद्वारावर नोटीस लावण्यात येत असते एक्स-रे मशीन साठी रुग्ण गेले असता पंधरा दिवसापासून एक्स-रे विभागातील दरवाजा बंद असल्याचे असल्याची दिसून आले.साधा खोकला या औषधाचा पुरवठा नसल्यामुळे शासन आपल्या दारी असे म्हणता येईल का?