चेक अनादर प्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता-रक्कम देण्याची ऐपत नाही आणि अवैध सावकारी सिद्ध झाल्याने निर्दोष सुटका

356

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.12सप्टेंबर):- येथील न्यायालया प्रकरण चेक अनादर प्रकरणी सतत शिक्षा ठोठावल्या जात असतांना पुसद येथील विद्यमान प्रथम श्रेनी न्याय दंडाधिकारी जी. एस. वरपे यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे. फिर्यादी प्रविण वामन भालेराव राहणार शेलु याने आरोपी विनोद शंकर चव्हाण राहणार शिवाजी वार्ड पुसद यास उसनवार म्हणुन २,५०,०००/- दोन लाख पन्नास हजार रूपये दिले होते. व या रक्कमेच्या परतफेडीसाठी चेक दिला होता.

सदर चेक अनादरीत झाल्याने फिर्यादी प्रविण भालेराव याने आरोपी विनोद चव्हाण याचे विरूध्द चेक अनादर प्रकरण पुसद येथील फौजदारी न्यायालयात दाखल केले होते. फिर्यादी व आरोपीने आपला युक्तीवाद केला. न्यायालयाने फिर्यादीची अशी रक्कम देण्याची ऐपत नाही तसेच अवैध सावकारीत बाळु उर्फ विजय दशरथ खडसे रा. शिवाजी वार्ड पुसद याला कोरे चेक देण्यात आले होते असा आरोपीने घेतलेला बचाव स्विकार करून या प्रकरणात दि. १२/०९/२०२३ रोजी अंतिम निकाल देवुन आरोपीला निर्दोष मुक्त केले आहे. आरोपीकडुन अँड. ए. ए. खान व अँड. एस. एन. खराटे यांनी युक्तीवाद केला.