राजुरा येथील सोमेश्वर मंदिराकरीता २ कोटी ४३ लक्ष रुपये मंजूर-सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे फलित

65

▪️2 crore 43 lakh rupees sanctioned for Someshwar temple in Rajura-The result of the efforts of Cultural Affairs Minister Sudhir Mungantiwar

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.12सप्टेंबर):- चंद्रपूर जिल्ह्यासह विदर्भातील शिवभक्तांसाठी आराध्य दैवत असलेल्या राजुरा येथील श्री क्षेत्र सोमेश्वर संस्थानचा विकास व्हावा, या राज्य संरक्षित स्मारकामध्ये सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी मा.ना.सुधीर मुनगंटीवार वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर यांनी दिलेला शब्द पूर्ण केला असून मंदिराच्या संवर्धनासाठी व सुविधांसाठी २ कोटी ४३ लक्ष ९७ हजार रुपये निधी मंजूर झाला आहे.

नुकताच ना. मुनगंटीवार यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे सिद्धेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी १४ कोटी ९३ लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर सोमेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी ग्रामस्थ व स्थानिक लोकप्रतिनिधीकडून सातत्याने मागणी होत होती, त्या मागणीची दखल घेत सांस्कृतिक कार्य मंत्री यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता आता त्याला मोठे यश प्राप्त झाले असून सोमेश्वर मंदिरासाठी २ कोटी ४३ लक्ष ९७ हजार निधी मंजूर झाला आहे .यामुळे मंदिराचे जतन व दुरुस्तीचे कामे गतीने पूर्ण होतील असा विश्वास वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. या संदर्भातील अध्यादेश नुकताच निर्गमित करण्यात आला आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव एकछत्र योजनेंतर्गत सोमेश्वर मंदिर या राज्य संरक्षित स्मारकाच्या जतन व दुरुस्तीच्या कामांच्या अंदाजपत्रकास सांस्कृतिक कार्य विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सोमेश्वर मंदिराच्या जतन आणि दुरुस्तीचे काम तात्काळ होण्यासंदर्भातील कार्यवाही तात्काळ करण्याची सूचना संबंधित यंत्रणेला केली होती. त्यानुसार शासन निर्णय पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.

यामध्ये मंदिराचे जतन व दुरुस्ती करणे, दगडी सीमाभिंत बांधणे, जुन्या बांधकाम पृष्ठभागाची रासायनिक प्रक्रियेद्वारे स्वच्छता, झाडे- झुडुपे काढणे, ग्राऊंटींग करणे, लोखंडी ग्रील बसविणे, सूचना फलक, माहिती फलक आणि दिशादर्शक फलक बसविणे आदी कामे यामध्ये समाविष्ट आहेत.

ना. सुधीर मुनगंटीवार यांनी वाचनपूर्ती केल्याबद्दल भगवान महादेवाचे भक्तगण व परिसरातील जनतेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहे.

2 crore 43 lakh rupees sanctioned for Someshwar temple in Rajura-The result of the efforts of Cultural Affairs Minister Sudhir Mungantiwar

 

Chandrapur, Dt. 12 – Shri Kshetra Someshwar Sansthan in Rajura, which is the idol of Shiva devotees in Chandrapur district and Vidarbha, has fulfilled the promise given by Hon. Sudhir Mungantiwar Minister of Forest and Cultural Affairs and Guardian Minister Chandrapur for the development of Sri Kshetra Someshwar Sansthan in this state protected monument. 2 crore 43 lakh 97 thousand rupees has been approved.

not recently Due to Mungantiwar’s follow-up, a fund of Rs 14 crore 93 lakh was sanctioned for the restoration of Siddheshwar temple. After that, there was a continuous demand from the villagers and local representatives for the restoration of Someshwar temple, taking note of that demand, the Minister of Cultural Affairs followed up continuously. Sudhir Mungantiwar, Guardian Minister of Forests, Cultural Affairs and Fisheries as well as Chandrapur District has expressed the belief that the works will be completed speedily. An ordinance in this regard has been issued recently.

The Department of Cultural Affairs has given administrative approval to the budget for the conservation and repair work of Someshwar Temple, a state protected monument, under the Amrit Mahotsav Ekchhatra Yojana of Independence. Sudhir Mungantiwar had instructed the concerned authorities to take immediate action regarding the preservation and repair work of Someshwar temple. According to the government decision, the Department of Tourism and Cultural Affairs has given administrative approval.

This includes preservation and repair of the temple, construction of stone boundary wall, cleaning of old construction surface by chemical process, removal of trees and bushes, grounding, installation of iron grill, installation of notice boards, information boards and direction boards etc.

Mr. Sudhir Mungantiwar is expressing gratitude on behalf of the devotees of Lord Mahadev and the people of the area for completing the reading.