मांडवा येथे पोळा सण शांततेत व मोठ्या उत्साहाने साजरा

142

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.14सप्टेंबर):-भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. शेतकऱ्याचा बैलपोळा हा सण सर्वात महत्त्वाचा सण असतो . या दिवशी बैलाना आंघोळ घालून चांगल्या प्रकारे सजवल्या जाते व पुरणपोळीचा नैवेद्य भरून गावातून मिरवणूक काढल्या जाते.

शेतामध्ये बळीराजाच्या खांद्याला खांदा लावून कष्ट करणाऱ्या सर्जा राजाच्या कृतज्ञतेसाठी अनेक पिढ्यांपासून या उत्सवाचा ,आयोजन प्रत्येक गावात शेतकऱ्याकडून केले जाते.त्याचप्रमाणे मांडवा येथील ग्रामपंचायत कार्यालय समोरच्या प्रांगणात मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव व रहिवासी नागरिक ,महिला , लहानांसह समस्त गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मानाच्या बैल जोडीचे लग्न लावून विधीवत पूजा करण्यात आले. आणि पूजा केल्यानंतर काही वेळानंतर सटवा दलसिंगारे,अरुण मंदाडे, प्रकाश राठोड यांनी झडत्या म्हटल्यावर सर्व बैल जोड्यांचे विसर्जन झाले अशाच प्रकारे बळीराजांचा सर्वात मोठा आवडता सण बैलपोळा मोठ्या आनंदात उत्साहाने पार पडला आहे. पोळा हा उत्सव पाहण्यासाठी गावातील समस्त नागरिक, महिला, बालक सहभागी झाले होते.

—————
कित्येक वर्षापासून मांडवा येथे पोळा हा सण अतिशय शांततेत व मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो . मांडवा येथे सध्या १३७ बैलजोडी आहेत.तानापोळ्याच्या दिवशी श्री संत सेवालाल महाराज मंदिराजवळ अंकुश राठोड यांच्याकडून गेल्या वर्षापासून सर्व शेतकऱ्यांना टाँवेल व टोपी देऊन सत्कार केल्या जातो.हे वैशिष्ट्ये पूर्ण आहे-पोलीस पाटील दत्तराव पुलाते