बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाची चंद्रपूर जिल्हा आणि शहर कार्यकारिणी गठित

53

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.15सप्टेंबर):- जिल्ह्यातील बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांची बैठक बुधवार दिनांक १३ सप्टेंबर२०२३ ला स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात मोठ्या उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली ‌बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्याचे अध्यक्ष राजकुमार जवादे हे होते तर मार्गदर्शक म्हणून केंद्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ ‌प्रा. टी.डी.कोसे, बहुजन एम्प्लॉइज फेडरेशनचे जेष्ठ नेते सिद्धार्थ सुमन, विदर्भ प्रदेश अध्यक्ष विजय शिडाम, बहुजन विद्युत निर्मिती कंत्राटी कामगार युनियनचे नितिन वाढई इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

सर्वत्र बहुजन समाजाला संविधानाने दिलेले हक्क आणि अधिकार धोक्यात आले आहेत तेव्हा बहुजन समाजातील कामगार आणि कर्मचाऱ्यांनी बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया मध्ये सामील व्हावे असे आवाहन अध्यक्ष स्थानावरून बोलतांना राजकुमार जवादे यांनी केले.सिद्धार्थ सुमन यांनी बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाच्या निर्मितीचा आढावा घेतला. त्यानंतर चंद्रपूर जिल्हा आणि शहर कार्यकारिणी निवडण्यात आली.

जिल्हाध्यक्ष- प्रा. डॉ.संजय रामटेके, जिल्हा सचिव – संजय खोब्रागडे उपाध्यक्ष -१- प्रा‌. डॉ. विजय सोमकुंवर, उपाध्यक्ष २-योगेश तुराणकर संघटन सचिव – नवनाथ देरकर ,सह सचिव १- सलिम कुरेशी, सहसचिव २- सुधाकर तेलसे, सहसचिव ३- सिद्धार्थ वासनिक, जिल्हा संघटक – प्रा. डॉ. प्रकाश बोरकर कोषाध्यक्ष – प्रा‌ मनोज निरंजने प्रसिद्धी प्रमुख – सुदर्शन कांबळे कार्यकारिणी सदस्य – विनोद गवळी, राकेश कालेश्वर, डॉ. ‌प्रा.शोभा गायकवाड, डॉ.प्रा‌.ज्योत्सना खोब्रागडे, प्रा.ललित गेडाम, डॉ ‌प्रा.नागसेन शंभरकर, डॉ.कपिल गेडाम, डॉ.प्रा.दीलीप वहाने तर चंद्रपूर शहर अध्यक्ष म्हणून संजय साखरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.