मांडवा येथे तान्ह्यापोळ्याला बळीराजांचा सत्कार

257

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.16सप्टेंबर):- तालुक्यातील मांडवा येथील शांतीधामात लोकसभागातून हजारो रोपट्यांचे वृक्षारोपण, प्रवेशद्वार ,कमान ,पाण्याची व्यवस्था , लाइटिंगची व्यवस्था,निवारा शेड,विसावा ओटा, भगवान श्री शंकराची भव्यदिव्य बैठक अवस्थेत मूर्ती,पहाड इत्यादी सोयी सुविधा पूर्ण करण्यासाठी प्रेरणादायी ठरणारे पुसद येथील एका किराणा दुकानात काम करून आपली उपजिविका करणारे अंकुश राठोड यांनी आईच्या तेरवीचा खर्च टाळुन शांतीधामतील कमानीसाठी लागणारा खर्च देऊन आणि यांनी गेल्या वर्षापासून तान्ह्यापोळ्याला बळीराजाचा टॉवेल व टोपी देऊन सत्कार करण्याचा स्तुत्य पूर्ण उपक्रम केला होता.

हा स्तुत्यपुर्ण उपक्रम याही वर्षी श्री संत सेवालाल महाराज मंदिराजवळ तान्ह्या पोळ्याला येणाऱ्या बैलांचे पूजन करून बळीराजाचे टॉवेल व टोपी देऊन अंकुश राठोड व सपत्नीक रेणुका राठोड आणि मुलगा लालसिंग राठोड दांपत्यानी सत्कार केला.यावेळी तांड्यातील तथा गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक ,शेतकरी बांधव, महिला , बालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.