भारतीय संविधान वाचविण्यासाठी संघटीत होणे आवश्यक-विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार

516

🔹प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात अलोट गर्दी

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-8605592830

चिमुर(दि.16सप्टेंबर):- केंद्रातील भाजपचे शासन दलीत, आदीवासी, ओ.बी.सी, बहुजन समाजाच्या विरोधात कायदे बनवित आहे. भारतीय संविधान बदलविण्याची प्रक्रिया सुरू असतांना आपण स्वस्थ कसे बसनार? शंभर दिवसात महागाई कमी करू असे आश्वासन देवुन सत्तेत आलेले भाजप सरकारच्या काळात महागाई, बेरोजगारी, काळाबाजार, वाढलेला आहे. भारतीय संविधानातील सामान्य नागरीकांचे हक्क व अधिकार नाकारण्याचे काम सुरू आहे.

महाराष्ट्रात “एक फुल- दोन हाफ“ चे नेतृत्वाखाली मंत्रीमंडळ कार्यरत असुन शासकिय नोकर भरतीमध्ये कंत्राट पद्धत सुरू केली आहे. महाविकास आघाडीच्या काळात फक्त ३५ संवर्गाचे कंत्राट पद्धतीने पदे भरण्याचा प्रस्ताव होता, मात्र शिंदे सरकारने १३५ संवर्गाची पदे भरती कंत्राट पद्धतीने पद भरण्याचे निश्चित केले आहे. यामुळे सामान्य कुटुंबातील युवकांचे हाताला काम मिळणार नाही. त्याकरीता केंद्र व राज्य शासनातील सत्ताधारांना खाली खेचने हाच पर्याय असल्याचे प्रतिपादन विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केले.

जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष तथा चिमुर विधानसभा क्षेत्राचे कॉंग्रेस समन्वयक डॉ. सतिश वारजुकर यांचे वाढदिवसानिमीत्य चिमुर तालुका कॉंग्रेस कमेटीच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात विजय वडेट्टीवार बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश कॉंगेस कमेटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले होते.

यावेळी मंचावर आमदार अॅड. अभिजीत वंजारी, आमदार सुधाकर अडबाले, जेष्ठ संपादक बाळ कुलकर्णी, प्रदेश कॉंग्रेस कमेटीचे मुख्य प्रवक्ता अतुल लोंढे, महाराष्ट्र प्रदेश कॉंगेस कमेटीचे महासचिव माजी आमदार डॉ. अविनाश वारजुकर, माजी आमदार नामदेवराव उसेंडी, माजी आमदार आनंदराव गेडाम महाराष्ट्र प्रदेश कॉंगेस कमेटीचे सचिव डॉ. नितीन कोडवते, चंद्रपुर महिला कॉंग्रसच्या जिल्हा अध्यक्ष नम्रता ठेमसकर,चिमूर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष नागेंद्र चट्टे,अनुजाती कांग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रफुल खापर्डे, प्रा. राम राऊत, पंजाबराव गावंडे, अॅड. गोविंदराव भेंडारकर, अॅड. दिगांबर गुरपुडे, संजय डोंगरे, ओबीसी कांग्रेसचे प्रदेश संघटक धनराज मुंगले, माधव बिरजे, बांधिलकी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डॉ. अनमोल शेंडे, गडचिरोली जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, जिल्हा परिषद माजी सदस्य गजानन बुटके, विनोद बोरकर, धनराज मालके, रोशन ढोक, स्वप्नील मालके,सोशल मिडिया अध्यक्ष पप्पू शेख,डॉ. रहेमान पठाण, संजय घुटके, चिमूर शहर अध्यक्ष अविनाश अगडे, साईस वारजूकर आदी मान्यवर उपस्थीत होते.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप प्रधानमंत्री मोदीने केला होता. त्याच राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना सोबत घेऊन आता महराष्ट्रात सत्तेत आहेत. दहशत निर्माण करूण सत्ता उपभोगणाऱ्या भाजपला जनता कंटाळलेली आहे. असे विविध विषयावर बोलतांना वडेट्टीवार पुढे म्हणाले चिमुर विधानसभा क्षेत्रातील आमदार भांगडिया हे भष्ट्राचारी असुन त्यांना सत्तेच्या बाहेर काढल्याशिवाय मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेचे पाणी शेतकऱ्यांना मिळणार नाही. रक्षाबंधन निमीत्त भांगडिया यांनी साडी सोबत मंगळसुत्र दिले. हा सर्व महिला भगीनींचा अवमान आहे. बहिणाना मंगळसूत्र देणाऱ्या व्यक्तीला आपले घरासमोर उभे करू नका. त्यांना हद्दपार करण्याकरीता कार्यकर्त्यांनी जनतेला संघटीत करण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन वडेट्टीवार यांनी केले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश कॉंगेस कमेटीचे प्रदेश अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी भाजपचे शेतकरी, ओ.बी.सी, एस.सी, आदिवासी, विरोधी धोरणाचा जोरदार समाचार घेतला. व्यापारी प्रवृत्तीचे व्यक्ती सत्तेत असल्यामुळे ते स्वतःचाच फायदा करून घेत आहेत. सामान्य जनतेला न्याय मिळण्याकरीता काग्रेस शिवाय पर्याय नसल्याचे मत नानाभाऊ पटोले यानी व्यक्त केले. यावळी विनोद बोरकर, प्रणया गड्डमवार, अनमोल शेंडे, विलास डांगे, गजानन बुटके, धनराज मुंगले, राम राऊत, बंटी शेळके, संजय घुटके यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. दरम्यान श्रीहरी बालाजी महाराज देवस्थान पासुन पदयात्रा काढण्यात आली. तालुका कॉंग्रेस कार्यालयात रक्तदान शिबीर देण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉंग्रस कमेटीचे तालुका अध्यक्ष डॉ. विजय गावंडे, संचालन सुवर्णा ढाकुणकर, प्रणया गड्डमवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार विजय डाबरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता राजु कापसे, शांताराम सेलवटकर, प्रमोद चौधरी, नेताजी मेश्राम, रमेश ठाकरे यांचे मार्गदर्शनात शेकडो कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.