रोडच्या बोगस आणि निकृष्ट कामाच्या विरोधात अमरण उपोषण

121

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.17सप्टेंबर):-नगरपरिषद कार्यालय अंतर्गत चालू आसलेल्या शहरातील रोड व नालीचे निकृष्ट व बोगस दर्जाच्या झालेल्या कामाची कॉलिटी कंट्रोलने चौकशी करून गुत्तेदारास काळ्या यादित टाकुन शहरंअभियंता यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी अमरण उपोषणाचाइशारा दि.24 ऑगस्ट रोजी दिलाहोता.मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले होते की जुनी भाजी मंडई, वरद कलेक्शन नवामोंढा येथील होत असलेले रोड व नालीचे बांधकाम अतिशय बोगस व निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे.

तर सदरील रोड, नालीचे बांधकाम करतांना अंदाजपत्रका प्रमाणे न करता मातीमिश्रीत मुरमाने दाबून तर काही ठिकाणी रोड न खोदताच पहिल्या रोडवरच रोड करण्यात आले असुन पहिली नाली जशासतशी ठेवून नालीच करण्यात आली नाही.हे सर्व रोड, नालीचे बांधकामाची गुणवत्ता नियंत्रका मार्फत तपासणी करून गुत्तेदाराचे नाव काळ्यायादित टाकुन शहरं अभियंता यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज (दि.16 सप्टेंबर शनिवार) पासुन संपादक राजेश कांबळे, पत्रकार मोसीनखान पठाण हे अमरण उपोषणास बसले आहेत