मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्य मा. हंसराजजी अहिर राष्ट्रीय अध्यक्ष (राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग भारत सरकार) यांच्या शुभ हस्ते जिवती येथे दरवर्षी प्रमाणे ध्वजारोहन संपन्न……..

77

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.17सप्टेंबर) :- देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या जन्म दिना निमीत्य (राष्ट्रीय सेवादिन) विवीध कार्यक्रमाचे आयेजन केले होते. दिनांक १७ सप्टेंबर २०२३ रोज रविवार ध्वजारोहन :- सकाळी ७ : ४० वाजता छत्रपती शिवाजी महाराज व संत रामराव महाराज पुतळ्याजवळ हनुमान मंदीर परिसर बसस्टॉप जिवती येथे ध्वजारोहण संपन्न झाला.

या कार्यक्रमाला प्रमुख्याने उपस्थिती मा. श्री. अडॅ. संजयभाऊ धोटे (माजी आमदार राजुरा विधानसभा) श्री देवराव भाऊ भोंगळे (माजी जि.प.अध्यक्ष) मा. श्री. सुदर्शनजी निमकर (माजी आमदार राजुरा विधानसभा) मा. श्री. खुशालभाऊ बोंडे (लोकसभा विस्तारक भाजपा) मा. श्री. राजुभाऊ घरोटे (जिल्हा अध्यक्ष किसान आघाडी भाजपा) आदी उपस्थित होते.

हैदराबाद_मुक्ती_संग्राम_दिन निमित्त झेंडावंदन केले, भगवान विश्वकर्मा यांच्या जयंती निमित्त प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ, आणि विद्यार्थ्यांचा तसेच विविध क्षेत्रात, सामाजिक कार्यात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या तालुक्यातील व्यक्तींचा व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार केला. आणि त्यानंतर नगर पंचायत चे सफाई कामगारांचा सन्मान आणि सत्कार करण्यात आला.संबोधित करतांना जागतिक किर्तीचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदणीय नरेंद्र मोदी जी यांचाही आज जन्मदिन असल्याचे नमुद करीत नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाला तालुक्यातील उपस्थित भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष केशवराव गिरमाजी, माजी उपसभापती महेश देवकते, तालुका महामंत्री दत्ताभाऊ राठोड, तालुका महामंत्रीसुरेश दादा केंद्रे, अनुचित जाती तालुकाध्यक्ष प्रल्हाद मदने,गोपीनाथ चव्हाण, भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष गोविंद टोकरे,माजी सभापती सुनील मडावी, सरपंच सौ . वर्षाताई जाधव, नगरसेविका सौ. उर्मिला बेल्लले, महिला तालुकाध्यक्ष सौ अमृतवर्षा पिल्लेवाड,माधवराव कुरसंगे, राजेश राठोड, युवा नेते विजय गोतावळे,विठ्ठल चव्हाण माधव निवडे, तालुका उपाध्यक्ष तुकाराम वारलवाड, संतोष जाधव, श्रीदास राठोड, सरपंच पुंडलिक गिरमाजी, आनंद कदम, अंबादास कंचकटले,मोहन पांचाळ ,बालाजी भुते ,मुनीर सय्यद, शिवाजी बोईनवाड, साहेबराव राठोड,बालाजी बिरादार, सौ पार्वताबाई गवाले, सौ विजयाताई चव्हाण, राज बेल्हाळे, बालाजी नलबले, चंदन राठोड, अनंता बावळे, , सूर्यकांत खांडेकर, निजाम शेख, विष्णू जाधव, धनराज आडे, भारत चव्हाण, आनंद पवार, देविदास तोगरे, जयराम ठोंबरे, मारुती भानगीर,संबा शिंदे, संग्राम बाजगीर आदी उपस्थित कार्यकर्ते होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश गोविंद राठोड यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गोविंद भाऊ टोकरे यांनी केले..