राष्ट्रीय चारित्र्याचे विद्यार्थी घडविणे काळाची गरज-डॉ. नितीन बावळे

77

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.19सप्टेंबर):-येथील संत जनाबाई शिक्षण संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ‘मराठवाडा मुक्ती संग्राम दिन’ अमृत महोत्सवानिमीत्त इतिहास विभागाच्या वतीने आयोजित व्याख्यानात प्रमुख व्याख्याते डॉ. नितीन बावळे, शारदा महाविद्यालय, परभणी यांनी राष्ट्रीय चारित्र्याचे विद्यार्थी घडविणे काळाची गरज असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रा. डॉ.आत्माराम टेंगसे यांची उपस्थिती होती.याप्रसंगी त्यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यातील विविध घटनांचा आढावा घेतला.

यात आर्य समाज,शैक्षणिक परिषद, सुधारणा संघटना,स्वामी रामानंद तीर्थ,हुतात्मा गोविंद पानसरे यांच्या कार्यासह परभणी जिल्ह्यातील निजाम विरोधी चळवळी जसे जंगलतोड सत्याग्रह, झेंडावंदन सत्याग्रह, वंदे मातरम चळवळ, विद्यार्थी चळवळीचा आढावा घेवुन मराठवाडा मुक्ती संग्रामातील महिलांचे योगदान ही त्यांनी विशद केले.

प्रमुख उपस्थिती मा.अॅड.संतोषजी मुंडे, मा.प्राचार्य डॉ बी. एम.धूत,मा..सुभाषराव नळदकर, मा.प्रा.एन.डी. नागरगोजे, मा.प्रा.सोन्नर सर,मा..पेकम,मा.श्री.नागेश केरकर, माजी प्राचार्य फुलवाडकर इ.मान्यवर उपस्थित होते.यावेळी महाविद्यालयाचे विद्यार्थी अॅड.दिपक पौळ यांची अतिरिक्त सहायक अभियोक्ता, महाराष्ट्र शासन पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच इतिहास विभागाच्या वतीने मराठवाडा मुक्ती लढा अमृत महोत्सवानिमित्त भित्तीपञकाचे विमोचन करण्यात आले.

या कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत सातपुते, उपप्राचार्य संतोष गायकवाड, कार्यालयीन अधीक्षक भारत हत्तिअंबिरे, इतिहास विभागाचे प्रा.राजेश भालेराव,प्रा.अंगद कदम महाविद्यालयातील सर्व सहकारी प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ. दयानंद उजळंबे यांनी केले तर आभार विजय बेरळीकर यांनी मानले.