उस इंसान का मर जाना ही अच्छा है, जो खुद्दार नहीं।-देश जले और मैं कुछ न बोलूं, मैं ऐसा गद्दार नहीं — डॉ. संखला

166

✒️गडचिरोली प्रतिनिधी(चक्रधर मेश्राम)

गडचिरोली(दि.19सप्टेंबर):-एक साधारण चोर आपले पैसे, आपली बॅग, आपले दागिने चोरतो पण एक राजकारणी चोर आपला भविष्य, रोजगार , धंदा, आरोग्य, शिक्षण व अधिकार चोरतो. यामधील महत्वाची गोष्ट म्हणजे साधारण चोर कुणाला लुटायचं हे निवडतो ? पण राजकारणी चोरास, आपण स्वतः हून स्वतःला लुटण्यास निवडून देतो. सध्या देशात एवढीच लोकशाही उरली असून अशा लोकशाहीचा उदोउदो करण्यासाठीच सरकार, राजकारणी व काही स्वार्थी, मतलबी पत्रकार नेटाने काम करतांना दिसत आहेत. असे स्पष्ट मत समाज व्यवस्थेविषयी डॉ. संखला यांनी व्यक्त केले आहे.

पण त्याचवेळी भारतातील पगारदार आणि सेवादार असलेले डॉक्टर ,वकील/अभियंते आपल्या पगाराच्या आणि पैशाच्या शेपटीने आपली अब्रू झाकू पाहत आहेत . मला काय फरक पडतो ? माझं काय नुकसान आहे काय, त्याचं तो पाहत बसेल, तो चूप आहे तर मी कशाला बोलू ? आपलं घर भलं नि आपण, पैसा येतोय, मग तो कोणत्याही मार्गाने असू दे.
देश गेला चुलीत, लोक जातील खड्ड्यात, माझी मुलं अमेरिकेत, पगार वाढतोय ना, बंगला आहे, प्लॉट आहेत, मुंबई-पुण्यात 2 किंवा 3 BHK फ्लॅट आहे, लक्झरी कार आहे, दुसरे मुल चांगले शिकत आहेत . आणखी काय पाहिजे, बोललो तर लोक काय म्हणतील? मित्र दूर जातील. बॅंक बॅलन्स आहे चिंता नाही.

यह देश की वास्तविकता है। सामान्य विचारो के भारतीय लोग हमेशा अय्याशी और अवसरों, त्योहार, कार्यक्रमों और पार्टीज, जश्न मनाने में व्यस्त रहते हैं, और इसलिए विचार, आचार, रियल स्टैण्डर्ड की समझ भूल चुके हैं। उनका मस्तिष्क अब किसी गधे की तरह असली स्वर्ग और सड़ा मल, नाली के बीच अंतर करने की क्षमता खो चुका हैं। गटर का पत्थर और असली हीरे, सम्मान और सम्माननीय, दलाल और चाटू में अंतर समझना भूल चुका हैं। इसलिए बच्चों का देश का भविष्य किसी भ्रष्ट कुत्तों और दलालों द्वारा नष्ट किया जा रहा है। उस देश को शर्म आनी चाहिए जहां बुद्धिमान, ईमानदार और देशभक्तों के बजाय नालायक चोर मवाली भ्रष्ट दलालों की पूजा और अनुसरण किया जाता है, ऐसे देश और अगली पीढ़ी का भविष्य हमेशा नाली में सड़ता रहेगा। धिक्कार है, लानत ऐसे लोगो ं की. पण चिंता करायची नाय….

चिंता नाही, या शब्दात भिषण भिती दडलेली आहे, वाघ सुध्दा तेव्हा घाबरतो जेव्हा त्याची शावके आवाज देऊनही दडलेल्या जागेतून बाहेर निघत नाही कारण निसर्गाचा नियम त्याला माहित आहे, तो इतरांच्या पिलांना खातो त्यामुळे त्याच्या शावकांना मारणाराही या निसर्गात आहे हे तो जाणतो.
एक दिवस जर कामवाली कामाला आली नाही तर आपण तिला सतरा प्रश्न विचारणार, फुकट काम करतेस का असंही ठणकावणार, तिची ऐपत काढणार पण पावसाळ्यात नालीतील पाणी घरात शिरल्यावर साध्या नगरसेवकाला जाब विचारण्याची हिंमत डॉक्टर, वकील, अभियंते व पगारदारात नसते. अशी खंतही डॉक्टर संखला यांनी व्यक्त केली. कमी शिकलेल्या, बुध्दीहिन, चरीत्रहिन, व्यसनी, राजकारण्यांना हे तथाकथित बुद्धिमान, सो कॉल्ड पांढरपेशे घाबरतात. हे देशाचं दुर्दैव आहे. मजुर, शेतकरी प्रश्न विचारणार नाही किंवा व्यवस्थेत बदल घडवून आणणार नाही. त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न इतका भिषण आहे की समस्या काय? हे त्यांना कळणारच नाही. त्यांच्यासाठी बदल हा शब्दच महत्त्वाचा नाही. त्यांना असेल त्या परिस्थितीत जगणे व आलेला दिवस ढकलणे एवढंच कळते पण मग सत्तेला प्रश्न विचारणार कोण?

विरोधाने व्यवस्था मजबूत होते, समाजात समानता आणण्यासाठी विरोधाशिवाय दुसरा पर्याय नाही पण हा विरोध करणार कोण? विरोधक जवळपास निपचित आहेत. त्यामुळे बेलगाम घोड्यासारखी ही सरकार लोकांवर टाच मारून चाल करत आहे. या घोड्याला लगाम लावणारा एकच वर्ग उरलेला आहे व तो म्हणजे बुद्धिवंतांचा. पण सध्या देशातील डॉक्टर, वकील, अभियंते आणि पगारदार पळपुटे, घाबरट, अत्यंत स्वार्थी व असंवेदनशील झाले आहेत. मी इतरांपेक्षा बरा आहे व माझ्या घरी आग नाही यामध्येच समाधान मानत आहे पण या आगीचे चटके सर्वांना बसतील याचे भान ठेवले पहिजे.असे परखड मत डॉ. संपला यांनी व्यक्त केले