शब्दगंध चे संमेलन यशस्वी होईल : डॉ. संजय कळमकर

94

✒️अहमदनगर(पुरोगामी न्युज नेटवर्क)

अहमदनगर(दि.20सप्टेंबर):-साहित्य क्षेत्रात शब्दगंध ची वाटचाल अत्यंत यशस्वीपणे सुरू असून शब्दगंधला साहित्य क्षेत्रात मोठे स्वरूप प्राप्त झाले आहे, अहमदनगर जिल्ह्यातील नव्या जुन्या साहित्यिकांचा मेळ घातल्याने पंधरावे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन निश्चितच यशस्वी होईल*, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ.संजय कळमकर यांनी केले.

शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य च्या वतीने ७ व ८ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पंधराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या पूर्वनियोजनासाठी आयोजित कोहिनूर मंगल कार्यालयात अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी विचारपिठावर प्राचार्य डॉ.जी.पी.ढाकणे, ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे, संयोजन समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव पांडूळे,संस्थापक सुनील गोसावी, राजेंद्र उदागे,खजिनदार भगवान राऊत व डॉ. संजय कळमकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पुढें बोलताना डॉ. संजय कळमकर म्हणाले की, शब्दगंध साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने, काटेकोरपणे प्रयत्न सुरु आहेत . त्यामुळे हे संमेलन नक्कीच यशस्वी होणार आहे.प्रबोधिनी पठाडे, समृध्दी सुर्वे, दुर्गा कवडे, निवृत्ती श्रीमंदिलकर यांनी यावेळी कवितांचे वाचन केले. यावेळी झालेल्या चर्चेत मारूती सावंत, सरोज आल्हाट, सुभाष सोनवणे, राजेंद्र चोभे, डॉ. किशोर धनवटे, अजयकुमार पवार, बबनराव गिरी, स्वाती ठुबे, डॉ.अनिल गर्जे, प्रांजली विरकर, किशोर डोंगरे,शर्मिला गोसावी, जयश्री झरेकर, सुरेखा घोलप, शर्मिला रूपटक्के,बाळासाहेब शेंदूरकर,बाबासाहेब कुटे यांनी सहभाग घेतला. सर्व शाखांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी राजेंद्र फंड यांनी स्वागत केले तर कार्याध्यक्ष प्रा.डॉ.अशोक कानडे यांनी आभार मानले.संमेलनातील साहित्य प्रबोधन लोकजागर यात्रा,उद्घाटन, परिसंवाद ,चर्चासत्र, कथाकथन, काव्यसंमेलन, शाहिरी जलसा, सांस्कृतिक कार्यक्रम, पारितोषिक वितरण व समारोप समारंभ याबाबत सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. अहमदनगर जिल्ह्यसह महाराष्ट्रातील अनेक मान्यवर व नवोदित साहित्यिक या संमेलनास उपस्थित राहणार असल्याने स्वागताध्यक्ष आमदार संग्रामभैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व संमेलनाध्यक्ष डॉ.पुरुषोत्तम भापकर यांच्या उपस्थितीत होणारे हे संमेलन निश्चितच प्रेरणदायी होईल,असे मत प्राचार्य जी.पी. ढाकणे यांनी व्यक्त केले.ज्ञानदेव पांडूळे,चंद्रकांत पालवे, राजेंद्र चोभे, राजेंद्र उदागे यांनी केलेल्या सूचनांचा विचार करून नियोजन केले गेले.