चिमुरात मतिमंद तरुणीवर विवाहित युवकांनी केला अतिप्रसंग-तरुणाची केली तुरुंगात रवानगी

985

✒️चिमूर(पुरोगामी न्युज नेटवर्क)

चिमूर(चंद्रपूर)(दि.20 सप्टेंबर):- एका विवाहित तरुणाने घराजवळीलच मतिमंद तरुणीवर अतिप्रसंग केल्याची घटना महिनाभरापूर्वी घडली. मुलीने पोलिसांत तक्रार दाखल केली नव्हती. मात्र सोमवारी पुन्हा विवाहित तरुणाने तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. हा प्रकार तरुणीच्यचा आईच्या निदर्शनास येताच तिने चिमूर पोलीस ठाणे गाठून तक्रार केली.

तक्रारीवरून युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील विठ्ठल वाढई (३०) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे.

पीडिता मतिमंद तरुणी १९ वर्षांची आहे. आरोपी आणि पीडित एकाच वार्डात वास्तव्यास असून, एकमेकाच्या घराशेजारी राहतात. पीडित तरुणी आरोपीच्या तीन वर्षांच्या मुलाला खेळविण्यासाठी आरोपीच्या घरी गेली होती. तर आरोपीची पत्नी मजुरीच्या कामावर गेली होती. हीच संधी साधून सुनीलने तिच्यावर महिनाभरापूर्वी अत्याचार केला होता. मात्र तरणीने हा प्रकार कुणालाही सांगितला नाही. मंगळवारी पुन्हा आरोपीने तरुणीला घरी बोलावून अत्याचाराचा प्रयत्न केला. तरुणीने याबाबत आईला सांगितले. तिने थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून आरोपीवर भादंवि कलम ३७६ (२) (एल), ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव, प्रभारी ठाणेदार नीलेश चवरे यांच्या मार्गदर्शनात महिला पोलीस उपनिरीक्षक दीप्ती जयकांत मरकाम करीत आहे.

आरोपीला न्यायालयात दाखल करण्यात आले होते,न्यायालयाने त्याची तुरुंगात रवानगी केली आहे.