२३ सप्टेंबर रोजी डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयाच्या ३२ व्या वर्धापन दिनाचे आयोजन

79

✒️सांगोला(पुरोगामी न्युज नेटवर्क)

सांगोला(दि.21सप्टेंबर):- २३ सप्टेंबर रोजी डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला या कॉलेजच्या ३२ व्या वर्धापन दिनाचे आयोजन व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३६ व्या जयंती सोहळ्याचे आयोजन महाविद्यलयाच्या वतीने मल्टिपर्पज हॉल येथे सकाळी १०:३० वा. करण्यात आलेले आहे. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी मंगळवेढा मा. श्री. विक्रांत गायकवाड व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती समितीचे सदस्य मा. डॉ. अनिकेत भैया देशमुख हे उपस्थित राहणार आहेत.

प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेचे सचिव मा.श्री. विठ्ठलराव शिंदे सर, जनरल बॉडी सदस्य मा.आण्णासाहेब देशमुख, संस्थेचे अध्यक्ष मा. रामचंद्र खटकाळे, संस्था सदस्य मा. चंद्रकांतदादा देशमुख, सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. अनंत कुलकर्णी, संस्था सदस्य मा. बबनराव जानकर, पुरोगामी युवक संघटनेचे राज्याचे अध्यक्ष मा.डॉ.बाबासाहेब देशमुख, संस्था सदस्य मा.डॉ. अशोकराव शिंदे, संस्था सदस्य मा. दिपक खटकाळे, संस्था सदस्य मा.अवधुत कुमठेकर, संस्था सदस्य मा. जयंत जानकर हे उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहेत.

सदर वर्धापन दिन कार्यक्रमास व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती सोहळ्यास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय स्टाफ, चतुर्थश्रेणी कर्मचारी व न्यू इंग्लिश स्कूल पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व ज्यू. कॉलेज मधील सर्व शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर सेवक, विद्यार्थी, विद्यार्थींनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिकंदर मुलाणी व न्यू इंग्लिश स्कूल व ज्यू. कॉलेजचे प्राचार्य प्रा.हेमंतकुमार आदलिंगे, डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. मनोजकुमार माने, न्यू इंग्लिश स्कूल व ज्यू. कॉलेजचे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. मिलिंद पवार यांनी केले आहे.