दि महाराष्ट्र स्टेट को ऑप.बँक मर्या.च्या अमरावती शाखेचे कार्य कौतुकास्पद-मा.आमदार सौ.सुलभाताई खोडके

158

✒️अमरावती(पुरोगामी न्युज नेटवर्क)

अमरावती(दि.21सप्टेंबर):-“२०१० मध्ये या बँकेतर्फे २०५ आमदारांना कर्ज दिले त्यावेळी आजचे शाखा व्यवस्थापक श्री किशोर राऊत हे तेव्हा त्या विभागात होते, त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी जी सर्व आमदारांना सेवा दिली ते बँकेचे कार्य खूप कौतुकास्पद आहे.त्या कारणानेच मी अजूनही या बँकेची खातेदार आहे तसेच बँकेची अशीच प्रगती उत्तरोत्तर होवो ही शुभेच्छा.या बँकेच्या माजी उपाध्यक्षा व मा.खासदार स्व.उषाताई चौधरी यांनीच मला सहकार क्षेत्रात आणले असे विचार मा.आमदार सौ. सुलभाताई खोडके (अमरावती विधानसभा मतदारसंघ) यांनी केले.

त्या दि महाराष्ट्र स्टेट को ऑप.बँक लि. मुंबई या शेड्युल्ड बँकेच्या टोपे नगर येथील अमरावती शाखेच्या ३४ व्या वर्धापन दिनानिमित्त दि.१७ सप्टेंबर २०२३ ला संपन्न झालेल्या भव्य कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून विचार व्यक्त करीत होत्या.
दि महाराष्ट्र स्टेट को ऑप. बँक लि. मुंबई या शेड्युल्ड बँकेच्या अमरावती शाखेच्या ३४ व्या वर्धापान दिनाच्या अध्यक्षा मा.आमदार सौ.सुलभाताई खोडके (अमरावती विधानसभा मतदारसंघ ),उदघाटक मा.श्री. दिलीप बाबू इंगोले,(कोषाध्यक्ष, श्री.शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती), प्रमुख पाहुणे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री.गजाननरावजी पुंडकर, जयवंतरावजी पुसदेकर, श्री.केशवराव मेतकर, कार्यकारिणी सदस्य सुरेशदादा खोटरे, सुभाषरावजी बनसोड, उद्योजक रणजीत बंड (अस्पा बंडसन्स ऑटो प्रायव्हेट लिमिटेड,अमरावती), पंजाबराव देशमुख बँकचे अध्यक्ष श्री नरेश पाटील हे उपस्थित होते.

अध्यक्ष, उद्घाटक व प्रमुख अतिथी यांच्या शुभहस्ते शिक्षण महर्षी डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
सर्व पाहुण्यांचे स्वागत व सत्कार शाखा व्यवस्थापक श्री किशोर राऊत यांनी शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन केले. तसेच पाहुण्यांचे शब्द फुलांनी स्वागत अभंगकार व साहित्यिक प्रा.अरुण बा. बुंदेले यांनी स्वरचित स्वागतगीत सुमधूर आवाजात गाऊन केले आणि बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना 34 व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मनोगतातून व्यक्त केल्या.

“भाऊसाहेबांच्या आशीर्वादामुळे
दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँकेची प्रगती.”
– मा.दिलीपबाबू इंगोले
” सहकार क्षेत्र व बँकिंग क्षेत्र महत्त्वपूर्ण क्षेत्र आहेत. शिक्षणमहर्षी, माजी केंद्रीय कृषिमंत्री डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी सहकार,कृषी व शिक्षण क्षेत्रात अनमोल कार्य केले.या बँकेची अमरावती येथील शाखा डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या निवासस्थानी असल्यामुळे बँकेस नेहमीच त्यांचे आशीर्वाद लाभत असल्यामुळे बँकेची प्रगती होत आहे.” असे विचार उद्घाटक मा.श्री. दिलीपबाबू इंगोले,(कोषाध्यक्ष, श्री.शिवाजी शिक्षण संस्था ,अमरावती) उद्घाटकीय भाषणात व्यक्त केले.

“भारताबाहेरसुद्धा दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप.बँकेचा नावलौकिक आहे “
– श्री भूपेश गोहकर
” बँकेच्या विविध कर्ज योजना आहेत व बँकेच्या आर्थिक स्थिती चांगली आहे. या बँकेचा महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात व भारताबाहेरसुद्धा बँकेचा नावलौकिक आहे. या वर्धापन दिनाचा उद्देश ग्राहक व बँक यांचे अतूट नाते कायम राहावे हा आहे.”असे विचार या सहकार बँकेची प्रादेशिक कचेरी नागपूरचे मा.व्यवस्थापक श्री.भूपेश गोहकर यांनी व्यक्त केले”

सहकारी संस्थांना कर्ज पुरवठा करणारी बँक- राजाभाऊ देशमुख
” आपली ही बँक साखर कारखाने, जिल्हा बँका, सूतगिरणी,अर्बन बँक व इतर सहकारी संस्थांना कर्ज पुरवठा करते ग्राहकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची बँक कर्मचारी काळजी घेतात आणि म्हणूनच ही बँक आज प्रगतीपथावर आहे.”असे विचार बँकेचे माजी संचालक मा.श्री राजाभाऊ देशमुख यांनी व्यक्त केले .
—–
४०००/-कोटी नक्त मूल्य असलेली देशातील एकमेव सहकारी बँक-शाखा व्यवस्थापक -श्री किशोर राऊत
” या वर्षी बँकेचा नक्त नफा हा ६०९/-कोटी झाला असून ४०००/-कोटी नक्त मूल्य असलेली देशातील एकमेव सहकारी बँक आहे तसेच शाखेत जो ग्राहक येतो तो शाखेचाच होऊन जातो त्याला बँकेविषयी आपूलकी निर्माणच होते अशी सेवा दिली जाते.आजही मुंबई पुण्याचे ग्राहक/खातेदार बॅक व्यवस्थापकाच्या सेवेमुळे त्याच्या सोबत जुळून आहेत. रूजू झाल्यापासून शाखा कोटीत नफा कमावू लागली व एकही खाते एन पी ए तर नाहीच पण एक रूपयाही ओव्हर ड्यु नसलेली शाखा आहे. हे शाखा व्यवस्थापकाच्या व कर्मचारी यांच्या सेवेचे फळ आहे .”असे विचार आपल्या प्रास्ताविकात अमरावतीच्या बॅक शाखेचे व्यवस्थापक श्री किशोर राऊत यांनी व्यक्त केले.
प्रशासक मा. श्री. विद्याधरजी अनास्कर साहेब. व्यवस्थापकीय संचालक मा.श्री.दिघे साहेब,मुख्य सरव्यवस्थापक श्री माने साहेब, सरव्यवस्थापक श्री अनंत भुईभार साहेब यांच्या संकल्पनेतून संपन्न झालेल्या या कार्यक्रमास असंख्य ग्राहक व अमरावती शहर व परिसरातील डॉक्टर, वकील, इंजिनिअर, प्राचार्य, प्राध्यापक, उद्योजक, व्यावसायिक, विविध बँकेचे सीईओ, राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करणारी स्त्री-पुरुष मंडळी यांची भरपूर उपस्थिती होती.

वर्धापनदिनी ज्येष्ठ तसेच उत्कृष्ट ग्राहकांना सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.येणाऱ्या पाहुण्यांकरिता तसेच बँकेचे ग्राहक व हितचिंतक यांच्यासाठी सोलरचे प्रेझेन्टेशन तसेच अस्पा बंड यांच्या मारूती कार, जेपीजी होंडाच्या बाईक स्टाॅल पण लावण्यात आले होते.वर्धापनदिनाचे प्रास्ताविक शाखा व्यवस्थापक श्री किशोर राऊत यांनी बँकेच्या कार्याविषयी सविस्तर माहिती दिली. संचालन श्री गोपाल उताणे तर आभार प्रदर्शन श्री आकाश लाडूकर यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अधिकारी दिनकरजी ठाकरे, प्रा.बाबुरावजी शेळके व शाखा व्यवस्थापक किशोर राऊत तसेच बँकेचे अधिकारी सौ.रंजना निचळ, अविनाश वाटाणे, आकाश लाडूकर व शरद देशमुख, अनिल चव्हाण, राजेश गावंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.