मोर्शी येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबीरचे आयोजन !

117

🔹अंकुश घारड मित्र मंडळाचा अभिनव उपक्रम !

🔸23 सप्टेंबर रोजी हजारो नागरिकांना शिबिरात आरोग्य तपासणी करण्याचे आवाहन !

✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मोर्शी(दि.21सप्टेंबर):-वातावरणातील बदल दिवसेदिवस विवीध प्रकारच्या वाढत्या नवीन बिमाऱ्या, व वातावरणातील बदलामुळे विवीध आजार व रोगराई पसरण्याची भिती निर्माण झाली आहे. यावर मात करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता अंकुश घारड मित्र मंडळाच्या वतीने भव्य मोफत आरोग्य शिबीर आणि मोफत शस्त्रक्रिया शिबाराचे आयोजन शनिवार दिनांक 23 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 04 वाजेपर्यंत साबू मंगल कार्यालय मोर्शी येथे करण्यात आले आहे.या शिबिरामध्ये विविध हॉस्पिटल व विवीध आजारावरील तज्ञ डॉक्टर, डायग्नोस्टिक सेंटर सहभागी होणार आहेत.

परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांन शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ता अंकुश घारड यांनी केले आहे.

मोर्शी येथे भव्य आरोग्य तपासणी शिबिर अंकुश घारड मित्र परिवार, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय रुग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अमरावती, डालके आयुर्वेदिक पंचकर्म हॉस्पिटल, उपजिल्हा रुग्णालय मोर्शी यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होणार असून या शिबिरामध्ये आवश्यक कागदपत्रे आधारकार्ड, रेशनकार्ड, मेडिकल रिपोर्ट्स गरजेचे असून शिबिरामध्ये जनरल मेडिकल तपासणी, हृदयाच्या शस्त्रक्रिया, अन्ननलिका शस्त्रक्रिया, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, कान, नाक व घसा शस्त्रक्रिया, अंगावरील मोठ्या चरबीच्या गाठीची शस्त्रक्रिया, अंगावरील मोठ्या चरबीच्या गाठीची शस्त्रक्रिया, हार्निया शस्त्रक्रिया, मणक्याच्या शस्त्रक्रिया, किडनीचे उपचार, गर्भपिशवी शस्त्रक्रिया, स्त्री रोग तपासणी, यासह विविध प्रकारच्या तपासण्या व शस्त्रक्रिया, दंत चिकित्सा व उपचार, डोळ्यांच्या शस्त्रक्रिया, बालरोग उपचार, सर्व वात विकारावर यशस्वी आयुर्वेद उपचार होणार असून ग्रामीण भागातील नागरिक व युवकांना ड्रायव्हिंग लायसन्स बनविण्यासाठी आरटीओ कार्यालयात खेटे मारावे लागतात त्यामुळे नागरिकांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. आता मात्र या सर्व अडचणी कमी करण्यासाठी भव्य ड्रायव्हिंग लायसन्स कॅम्प चे आयोजन केल्यामुळे मोर्शी तालुक्यातील नागरिकांना दिलासा मिळनार असल्याची माहिती अंकुश घारड यांनी यावेळी दिली.

नागरी आरोग्य जपणे ही सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना आपली जबाबदारी आहे. त्यासाठी परिसरातील नागरिकांकरिता एकाच छताखाली विविध आरोग्य तपासणी व उपचार करता येईल, अशी सुविधा उपलब्ध करण्याचा आमचा संकल्प होता. त्यानुसार आम्ही या भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले असून नागरिकांनी आरोग्य शिबिरामध्ये सहभागी होऊन आरोग्य तपासणी करून घ्यावी.
– अंकुश घारड सामाजिक कार्यकर्ता