नारपठार येथे पं. स. जिवतीचे माजी उपसभापती श्री. महेशभाऊ देवकते व सरपंच श्री.मोतीराम सिडाम यांच्या हस्ते सिमेंट काँक्रेट रस्त्याचे भूमिपूजन व विकासकामाचा श्रीगणेशा

83

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.21सप्टेंबर):- जिवती तालुक्यातील ग्राम पंचायत लांबोरी अंतर्गत नारपठार येथील विकास कामाचे भूमिपूजन कार्यक्रम आज संपन्न झाला. जन सुविधा योजनेतून मा.ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांच्या माध्यमातून विविध विकास कामे मंजूर झालेले होते. सदर विकासकामे मंजूर व्हावे, यासाठी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे तसेच माजी आमदार संजयभाऊ धोटे यांच्या प्रयत्नातून ही विकास कामे मंजूर करण्यात आली होती.

या भूमीपूजन सोहळयाप्रसंगी जेष्ठ नेते तथा जिवती तालुक्याचे भा.ज.पा. अध्यक्ष श्री.केशव गिरमाजी, माजी उपसभापती महेश देवकते, कार्यक्रमाचे अध्यक्ष ,सरपंच श्री. मोतीराम सिडाम, युवा मोर्चा तालुका अधक्ष गोविन्द टोकरे, युवा नेते श्रीदास राठोड , माजी उपसरपंच श्री.रमेश पुरी,उपसरपंच कमलाकर जाधव, ह भ प प्रा.पांडुरंग सावंत सर, ओमप्रकाश जाधव, जनार्दन श्रीसागर, सखाराम ठोंबरे
,जनार्दन श्रीसागर, सखाराम ठोंबरे, जीवनसिंग ठाकूर ,चंद्र जाधव, संजय शिरसागर, नारायण ठोंबरे ,विठ्ठल कदम राजेश पेंदोर ,नंदू आत्राम ,सुधाकर जाधव ,बालाजी पांचाळ, गोविंद पांचाळ, शिवाजी कोहचाडे, परसराम कदम,माधव सीडाम, योगिंधर केवट ग्राम पंचायत सदस्य यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.