श्री राजेंद्र आंडे एक समाजसेवी व्यक्तिमत्त्व – प्रा.अरुण बुंदेले

181

✒️अमरावती(पुरोगामी न्युज नेटवर्क)

अमरावती(दि.23सप्टेंबर):-” सामाजिक बांधिलकी स्वीकारून महात्मा फुले बँकेच्या अध्यक्ष पदावरून समाजसेवा करणारे श्री.राजेंद्र आंडे एक समाजसेवी व्यक्तिमत्व असून समाजाच्या ऋणानुबंध या सांस्कृतिक चळवळीचे ते आधारस्तंभ आहेत.अनेक युवकांना व बचत गटांना कर्ज देऊन त्यांचे जीवन स्थिरस्थावर करण्याचा प्रयत्न श्री राजेंद्रजी आंडे बँकेच्या माध्यमातून सतत करीत असतात.”असे विचार प्रमुख अतिथी समाजप्रबोधनकर्ते प्रा.अरुण बुंदेले यांनी व्यक्त केले.ते स्थानिक वऱ्हाड विकास परिवारच्या वतीने महात्मा फुले बँकेचे अध्यक्ष श्री राजेंद्रजी आंडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा दि .19 सप्टेंबर 23 ला महात्मा फुले बँकेच्या सभागृहात संपन्न झाला.त्यावेळी प्रमुख अतिथी पदावरून विचार व्यक्त करीत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजभूषण वऱ्हाड विकासचे संपादक प्रा.श्रीकृष्ण बनसोड , प्रमुख अतिथी डॉ.गणेश खारकर , दिलीपराव लोखंडे ,ओमप्रकाश अंबाडकर,अभंगकार प्रा.अरुण बा.बुंदेले, इंजि.भरतराव खासबागे,प्रा.हेमंत बेलोकार होते . अध्यक्ष व प्रमुख अतिथींच्या हस्ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून अभिवादन केले.सर्वप्रथम अभंगकार व साहित्यिक प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांनी “श्री राजेंद्रजी आंडे ” या स्वरचित अभंगाचे गायन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. व श्री राजेंद्रजी आंडे यांचे अभिष्टचिंतन केले.

याप्रसंगी उपेक्षित समाज महासंघ,कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान,महात्मा फुले बँकेचे संचालक व कर्मचारी सर्वशाकीय माळी महासंघ व ऋणानुबंध परिचय महासंमेलन आयोजन समिती,महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन अमरावती जिल्हा,महाराष्ट्र राज्य एसटी सेवानिवृत्त कर्मचारी संघटना व इतर संघटनांच्या वतीने शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ,भेटवस्तू व पुस्तके देऊन श्री राजेंद्रजी आंडे यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले व हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

“वऱ्हाड विकासाच्या “इंजि.राजेंद्र आंडे गौरव विशेषांकाचे “विमोचन “

याप्रसंगी मासिक वऱ्हाड विकासाच्या ” इंजि.राजेंद्रजी आंडे गौरव विशेषांकाचे ” विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.या अंकातील ओमप्रकाश अंबाडकर यांचा ” माळी समाज ऋणानुबंध या लोकाभिमुख लोकचळवळीचे आधारवड श्री राजेंद्र अंडे”,श्री केशवराव कांडलकर यांचा ” सामाजिक बांधिलकी आणि जाणिवांचा परिस्पर्श असलेले व्यक्तिमत्व श्री आंडे ” ,श्री हेमंत बेलोकार यांचा ” सहकार चळवळीचे प्रेरणास्त्रोत श्री आंडे ” श्री मनोज भेले यांचा .” वक्तृत्व – कर्तृत्व – नेतृत्व यांचा सुरेख संगम म्हणजे श्री राजेंद्र आंडे “तसेच प्रा.श्रीकृष्णा बनसोड यांचा ” कै. महादेवराव आंडे यांचे समतेचे व मानवतावादी विचार आजही आचरणात आणण्याची गरज ” असे दीर्घ लेख व प्रा. अरुण बुंदेले यांचा ” इंजि. राजेंद आंडे “हा अभंग वाचनीय ठरला.

“म.फुले बँकेच्या माध्यमातून श्री राजेंद्रजी आंडे यांनी महिला व युवापिढीला उद्योगासाठी प्रवृत्त केले .”
– प्रा.श्रीकृष्ण बनसोड

महात्मा फुले बँकेच्या माध्यमातून श्री राजेंद्र आंडे यांनी युवापिढीला उद्योग व्यवसायासाठी ‘प्रवृत्त केले तसेच महिला बचत गटांना उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून देऊन त्यांना स्वावलंबी व स्वयंपूर्ण होण्यास मदतीचा हात दिला व देत आहेत. म.फुले बँकेची सर्व जाती धर्म पंथातील माणसांना जोडण्याची भूमिका निश्चितच सर्वांना प्रेरक आहे”.असे विचार अध्यक्षीय भाषणातून प्रा.श्रीकृष्ण बनसोड यांनी व्यक्त केले.

” कोणत्याही कार्यासाठी सर्व जाती धर्म पंथातील लोकांना सोबत घेणे आवश्यक.”
– श्री राजेंद्र आंडे

सामूहिकपणे आणि प्रामाणिक व सकारात्मक प्रयत्न आणि सर्व जाती-धर्म पंथातील ठेवीदारांचा विश्वास यामुळेच महात्मा फुले बँकेच्या विकासाचा आलेख सारखा वाढत आहे म्हणून कोणत्याही कार्यासाठी सर्व जाती धर्म पंथातील लोकांना सोबत घेणे आवश्यक आहे.असे सांगून महात्मा फुले बँकेमध्ये विश्वासावर गुंतवणूक करणाऱ्या प्रति कृतज्ञता व्यक्त करून सदैव सर्वांनी सहकार्य केले पाहिजे.” असे विचार सत्काराला उत्तर देताना श्री राजेंद्रजी आंडे यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे संचालन मधुकर आखरे तर आभार प्रा. डॉ.सौ.उज्वलाताई मेहरे यांनी मानले.

याप्रसंगी वसंतराव भडके, अॅड.प्रभाकर वानखडे,सागर आंडे ,सुधीरकुमार घुमटकर, सचिन वानखडे, अँड.अजय ढोरे अँड.आशीष लांडे,सुधाकर डेहनकर,रमेश भोयर,अजयराव सिनकर,जितेंद्र भेले,प्रदीप पांडव, ललित बैतुले,एम.पी.देशमुख , अनिल कुमार पेंढारी,सुरेशराव मेहरे, अरुण बेलसरे,विजयराव कोरडे,दिलीप आकोटकर , रामकुमार खैरे,अक्षय हाडोळे, राजेंद्र धुराटे,राजेंद्र जठाळे, स्वप्निल मावंदे,प्रमोद अंबाडकर, सागर पेठे ,शैलेश सोनार,रामरतन गणोरकर,राजीव नाचनकर,शिवाजी देवके,दीपक जुनगरे,आर.एस.ईसळ ,गोपाल उताणे, प्राचार्य मंदाताई निमकर सौ.राजश्री जठाळे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते