३० सप्टेंबर रोजी रंगचिंतक मंजुल भारद्वाज रचित ‘राजगति’ या नाटकाचा मराठी भाषेतील पहिला प्रयोग!

312

🔹’Rajgati’ drama written by theater artist Manjul Bhardwaj

✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मुंबई(दि.24सप्टेंबर):-रंगचिंतक मंजुल भारद्वाज रचित ‘राजगति’ या नाटकाचा मराठी भाषेतील पहिला प्रयोग आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण Acharya Atre Rangmandir, Kalyan येथे ३० सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११.३० वाजता प्रस्तुत होणार आहे.

“राजकारण वाईट आहे! भ्रष्ट आहे ! माझा राजकारणाशी काहीही संबंध नाही! I hate politics!” जेव्हा तुम्ही रागाच्या भरात हे बोलतात तेव्हा तुम्हाला माहित असते का ? की तुम्ही जगातील सर्वात मोठ्या लोकशाही मध्ये राहतात? Do you live in the world’s largest democracy?

तुमचा राजकारणाशी काही संबंध नसेल तर तुमच्यावर राज्य कोण करणार? तुमचा राजकारणाशी काही संबंध नाही तर संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण कोण करणार? If you have no connection with the politicians then who will protect the fundamental rights given by the Constitution? ‘आम्ही भारताचे लोक’ म्हणजेच भारताचे मालक असण्याचे कर्तव्य कोण पार पाडणार?

तुम्ही प्रामाणिक आहात आणि नेता भ्रष्ट? या नेत्यांना कोण निवडून देतो, आपणच ना? ही शरमेची बाब आहे की, आपण सुशिक्षित असूनही देशाचे नेतृत्व करण्याऐवजी अशिक्षितांच्या इशार्‍यावर कठपुतली सारखे नाचतो. ऑक्सिजन, ऑक्सिजन करत रस्त्यावर मरून पडतो. अन्नाच्या एकेक दाण्यासाठी खितपत पडतो.रात्रंदिवस राज्यकर्त्यांचे खोटे ऐकतो आणि ‘सत्यमेव जयते’ ची स्वप्ने पाहतो! भारतीयत्वाचा ‘गर्व’ बाळगण्याऐवजी विकारी नेत्यांच्या कट्टरतेचा गर्व बाळगतो? माणूस म्हणून मौलिक अधिकारांसह जगण्याची सर्वात मोठी हमी म्हणजे आपले संविधान आणि आपण जुमलेबाजच्या हमीवर विश्वास ठेवतो, जो आज आहे पण उद्या नसणार! किंवा अमेरिका, कॅनडा वा युरोपमध्ये नोकरी करतो. का ?

चला “राजगति” नाटकातून राजनीती ला समजून घेऊया! ‘राजकारण’ हे घाणेरडे नसून लोककल्याणाची पवित्र निती आहे. कसे? चला मंथन करूया, नाटक ‘राजगति’ तून !
…..
सुप्रसिद्ध रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित ‘राजगति’ हे नाटक पहिल्यांदा मराठीमध्ये प्रस्तुत होणार आहे. ३० सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११.३० वाजता आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण येथे.

नाटक: “राजगति” (मराठी)
लेखक – दिग्दर्शक : मंजुल भारद्वाज
मराठी अनुवाद : विवेक खरे
अनुवाद सहाय: अश्विनी आणि सायली
केव्हा: 30 सप्टेंबर, शनिवार, सकाळी 11.30 वाजता
कुठे: “आचार्य अत्रे रंग मंदिर”, कल्याण.

Drama: “Rajgati” (Marathi)
Writer-Director: Manjul Bhardwaj
Marathi translation: Vivek Khare
Translation assistance: Ashwini and Sayli

30 September, Saturday, 11.30 am
Where: “Acharya Atre Rang Mandir”, Kalyan

सुप्रसिद्ध रंग चिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित “राजगति” हे नाटक समता, न्याय, मानवता आणि संविधानिक व्यवस्थेच्या निर्मितीसाठी For equality, justice, humanity and creation of constitutional system ‘राजकीय परिदृष्याला’ बदलण्याची चेतना जागृत करते, ज्यामुळे आत्म-हीनतेचा भाव नष्ट होऊन आत्मबळाने प्रेरित चरित्राचे निर्माण व्हावे.

कलाकार: अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के आणि अन्य कलाकार/इतर.

कालावधी: 120 मिनिटे

नाटक : राजगति

आपले आयुष्य दर क्षणी ‘राजनीती’ ने प्रभावित आणि संचालित होत असते पण एक ‘सभ्य’ नागरिक असल्या कारणाने आपण केवळ आपल्या ‘मताचे दान’ करतो आणि आपल्या राजनैतिक भूमिकेपासून मुक्त होतो आणि मग दर वेळी राजनीतीला नावं ठेवतो आणि आपली मनोभूमिका ठरवून टाकतो की, राजनीती ‘वाईट’ आहे… चिखल आहे.. आम्ही सभ्य आहोत, राजनीती आमचे काम नाही, जर जनता प्रामाणिक आहे तर त्या देशाची लोकतांत्रिक राजनैतिक व्यवस्था भ्रष्ट कशी होऊ शकते ?..चला, एक सेकंद विचार करू या, की खरंच राजनीती वाईट आहे की आपण त्यात सहभागी न होऊन त्याला वाईट बनवत आहोत ?

चला जरा विचार करूया, की राजनैतिक प्रक्रियेविना विश्वातील सगळ्यात मोठी लोकशाही चालेल का ? नाही चालणार.. आणि जेव्हा ‘सभ्य’ नागरिक त्याला नाही चालवणार तर मग वाईट प्रवृत्तीचे लोक सत्ता चालवणार आणि तेच घडतं आहे..चला एक क्षण विचार करूया, की खरंच राजनीती वाईट आहे की आपण त्यात सहभागी न होऊन त्याला वाईट बनवत आहोत?..

आपण सगळे अपेक्षा करतो की, ‘गांधी, भगतसिंग, सावित्री आणि लक्ष्मी बाई’ या देशातच जन्माला यावे पण माझ्या घरात नाही .. You all expect that ‘Gandhi, Bhagat Singh, Savitri and Lakshmi Bai’ will be born in the country but not in my house.

चला यावर मनन करू आणि ‘राजनैतिक व्यवस्थे’ ला शुद्ध आणि सार्थक बनवूया ! समता, न्याय, मानवता आणि संविधानिक व्यवस्था निर्माणासाठी ‘राजनैतिक परिदृश्य’ बदलण्याची चेतना जागवू या ! ज्याने आत्महीनतेचा भाव उध्वस्त होऊन ‘आत्मबळाने’ प्रेरीत ‘राजनैतिक नैतृत्वाचा’ निर्माण होईल .

“थिएटर ऑफ रेलेवन्स” 31 वर्षांपासून फॅसिस्टवादी ताकदिंशी झगडत आहे . जागतिकीकरण आणि फॅसिस्टवादी शक्ती ‘स्वराज्य आणि समता’ या विचारांना उद्धवस्त करून समाजात विकार निर्माण करतात ज्याने संपूर्ण समाज ‘आत्महीनतेने’ ग्रासित होऊन हिंसक होऊन जातो. हिंसा मानवतेला नष्ट करते आणि कला मनुष्यात ‘माणुसकीचा’ भाव जागृत करते. कला, जी माणसाला माणुसकीचा बोध देते… कला ती जी माणसाला माणूस बनवते !

“थिएटर ऑफ रेलेवन्स” 31 वर्षांपासून सतत सरकारी, नीम सरकारी, कॉर्पोरेटफंडिंग किंवा कोणत्याही देशी विदेशी अनुदाना पासून मुक्त. सरकारच्या 300 ते 1000 करोड च्या अनुमानित संस्कृति संवर्धन बजेट च्या विरुद्ध ‘प्रेक्षक’ सहभागितेने उभे आहे आमचे रंग आंदोलन .. मुंबई पासून मणिपूर पर्यंत!

“थिएटर ऑफ रेलेवन्स” नाट्य सिद्धांताचे सृजक आणि प्रयोगकर्ता मंजुल भारद्वाज असे रंगचिंतक आणि रंग आंदोलक आहेत, जे राष्ट्रीय आव्हानांना फक्त स्विकारत नाहीत तर राष्ट्रीय उद्देशातून ते आपला रंग विचार “थिएटर ऑफ रेलेवेंस” च्या माध्यमातून, जन-माणसांसमोर ठेवतात. ह्या अभिजात लेखक – दिग्दर्शकाने आजतागायत 30 पेक्षा अधिक नाटकांचे लेखन दिग्दर्शन केले आहे. तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर थियेटर ऑफ रेलेवेंस सिद्धांताच्या माध्यमातून 1000 पेक्षा अधिक नाट्यकार्यशाळांचे संचालन केले आहे.

प्रेक्षक सहयोग आणि सहभागीतेने आयोजित या प्रस्तुती मध्ये आपल्या सक्रिय सहयोग आणि सहभागितेची अपेक्षा!